भात
भातपिकात सद्यःस्थितीत नत्र, जस्त, बोरॉन इ. अन्नद्रव्यांच्या कमतरता दिसून येत आहेत. अन्नद्रव्यांच्या कमतरतेची लक्षणे ओळखून वेळीच योग्य व्यवस्थापन केल्यास उत्पादनात होणारी संभाव्य घट रोखता येते.
✨नत्र - पानाचा रंग पिवळसर किंवा फिकट हिरवा होतो. पानातील हरीतद्रव्य कमी होते.
👉नत्रयुक्त खते फोकून न देता ब्रिकेटच्या स्वरूपात द्यावीत.
👉नत्राची शिफारसीत खतमात्रा (एकरी ४० किलो) योग्य प्रमाणात व विभागून द्यावी.
👉जमिनीतून नत्राचा ऱ्हास थांबविण्यासाठी युरीया खताबरोबर ५:१ प्रमाणात निंबोळी पेंडीचा वापर करावा.
✨जस्त - भातपिकाच्या जुन्या पानावर तपकिरी पट्टे उमटतात. नवीन पानाच्या देठाजवळ पान वाळल्यासारखे दिसते. सुरवातीला लाल तपकिरी चट्टे उमटतात, नंतर संपूर्ण पान वाळते.
👉पिकास चिखलणीवेळी एकरी १० किलो झिंक सल्फेट शेणखतातून द्यावे.
👉झिंक सल्फेट दिले नसल्यास आणि जस्ताची कमतरता दिसल्यास झिंक सल्फेट ५ ग्रॅम किंवा चिलेटेड झिंक १ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.
✨बोरॉन - कळीचा रंग फिक्कट हिरवा होतो. वाढणारी कळी मरते. परागकणांची निर्मिती कमी होते. परिणामी फलधारणा कमी होऊन उत्पादनात घट येते. भात पिकात ओंबी तयार होण्याच्या वेळी बोरॉनची कमतरता असल्यास ओंबी तयार होण्याचे प्रमाण कमी होते. तसेच पोचट दाण्याचे प्रमाण वाढते.
👉जमिनीत बोरॉनची कमतरता असल्यास पिकास चिखलणीवेळी एकरी २ किलो बोरॅक्स शेणखतातून द्यावे.
👉बोरीक अॅसिड १ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.
कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.