तूर
विषाणूजन्य रोग व त्यांचे व्यवस्थापन
⭕️वांझ रोगरोपावस्थेत झाडाच्या पानांवर प्रथम गोलाकार पिवळे डाग पडतात. अशी पाने आकाराने लहान पडून कालांतराने आकसतात. पाने पिवळी पडून झाडांच्या दोन पेरातील अंतर कमी होऊन त्यांना अनेक फुटवे फुटून झाडांची वाढ खुंटते. रोगग्रस्त झाडांना फुले व शेंगा येत नाहीत व ती शेवटपर्यंत हिरवी राहून झुडपासारखी दिसतात. रोगाचा प्रादुर्भाव रोपावस्थेपासून ते पीक पक्व होण्याच्या अवस्थेपर्यंत कधीही होऊ शकतो. जास्त पाऊस, २५ ते ३० अंश सेल्सिअस तापमान व जास्त आर्द्रता रोगाच्या वाढीस पोषक आहेत.
🛡️उपाययोजना
👉रोगग्रस्त झाडे वेळोवेळी उपटून टाकावीत.
👉रोगवाहक कीड ‘एरिडोफाईट माईटस्च्या’ नियंत्रणासाठी, डायकोफॉल (१८.५ ईसी) २.५ मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.
👉आधीच्या हंगामातील बांधावरील तुरीचा खोडवा उपटून नष्ट करावा.
कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.