शेळी जनावरातील जंत प्रतिबंधात्मक उपाय.

शेळी पालन:- 

दूषित चारा आणि पाण्यातून जंत शेळ्या-मेंढ्यांच्या शरिरात प्रवेश करून पचन संस्थेमध्ये, रक्तामध्ये व विविध अवयवांमध्ये वाढतात. त्यामुळे शरीरातील रक्त कमी होणे, जनावर अशक्त होणे, वजन घटणे, रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे अशी लक्षणे दिसून येतात. जंत वाढल्यानंतर उपचार करण्यापेक्षा ते वाढू नये, म्हणून प्रतिबंधात्मक उपाय योजनेच योग्य ठरेल. 

👉लडीच्या ढिगाभोवती शेळ्या चरायला सोडू नये.
👉सकाळी गवताच्या टोकावर असलेल्या दवामध्ये जंताच्या अळ्या असतात. त्यामुळे सकाळच्या वेळेस शेळ्यांना चरायला सोडू नये.
👉चरण्यास जाणार्‍या शेळ्यांना जंताची लागण होतच राहते, म्हणून पावसाळा सुरू होताना आणि पावसाळा संपताना असे दोनदा पशुवैद्यकाच्या सल्ल्याने जंतनाशक पाजावे.
 👉लड्यांची तपासणी करून आवश्यक असल्यास औषध पाजावे.
👉गोठा नेहमी स्वच्छ व कोरडा ठेवावा.
👉तळ्याच्या परिसरात अथवा दलदलीत शेळ्यांना चरू देऊ नये.
👉तळ्याच्या परिसरातील गोगलगाईंमध्ये काही जंतांच्या अळ्या वाढतात. म्हणून गोगलगाय निवारणासाठी योग्य त्या उपाययोजना कराव्यात. तळ्यात बदक पाळण्यानेही गोगलगाईंचा नायनाट होतो.
👉हिरवा चारा थोडा वेळ उन्हात वाळवून मगच द्यावा

कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.

Post a Comment (0)
Previous Post Next Post