केळी
पीक संरक्षण
👉करपा रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी बागेत कुठेही पाणी साचू देऊ नये. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून १ ग्रॅम कार्बेन्डाझिम किंवा २.५ ग्रॅम मॅंकोझेब प्रति लिटर पाण्यात १ मि.लि. स्टिकर मिसळून फवारणी करावी.
👉इर्विनिया रॉट (पोंगा कूज) या जिवाणूजन्य रोगामध्ये केळीचा पोंगा कुजतो, तसेच जमिनीलगत बुंधा कुजतो. या रोगाची लक्षणे दिसताच १०० लिटर पाण्यात ३०० ग्रॅम कॉपर ऑक्सीक्लोराईड, १५ ग्रॅम स्ट्रेप्टोसायक्लीन आणि ३०० मि.लि. क्लोरपायरीफॉस मिसळून या द्रावणाची २०० मि.लि. प्रति झाड आळवणी (ड्रेचिंग) करावी.
👉कांदेबाग केळीच्या घडांची कापणी योग्य पक्वतेला करावी. अधिक पक्व घडांवर फळमाशीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. प्रादुर्भावग्रस्त केळी गोळा करून नष्ट करावी. फळमाशीचा प्रादुर्भाव झालाच, तर बागेत ५० मीटर अंतरावर मिथील युजेनॉलचे सापळे ठेवून फळमाशीचा बंदोबस्त करावा.
कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.