हळद
हळद पिकासाठी एकरी ८० किलो नत्र, ४० किलो स्फुरद आणि ४० किलो पालाश या खतमात्रेची शिफारस आहे. संपूर्ण स्फुरद आणि पालाश लागवडीच्यावेळी द्यावयाचे असते. नत्र मात्र २ समान हप्त्यात विभागून द्यावे. पहिला हप्ता लागवडीनंतर ६ आठवड्यांनी द्यावयाचा असतो. तर नत्राचा दुसरा हप्ता भरणीच्या वेळी (लागवडीपासून १० ते १२ आठवड्यांनी) द्यावा. या वेळी एकरी ४० किलो नत्र (८७ किलो युरिया किंवा १९० किलो अमोनियम सल्फेट) तसेच सूक्ष्म अन्नद्रव्ये जसे ५ किलो फेरस सल्फेट, ४ किलो झिंक सल्फेट आणि एकरी ८ क्विंटल निंबोळी किंवा करंज पेंडीचा वापर करावा. भरणी करताना खते दिल्यामुळे ती योग्यरीत्या मातीत मिसळली जातात.
कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.