तूर
मर रोग सुरुवातीला झाडांची शेंड्याकडील पाने कोमेजतात, कालांतराने पाने पिवळी पडून जमिनीकडे झुकतात. काही झाडांवर जमिनीपासून खोडांपर्यंत तपकिरी रंगाचा पट्टा दिसून येतो. पीक दोन महिन्याचे असताना पाने व फांद्या सुकू लागतात. थोड्याच दिवसात संपूर्ण झाड वाळते. फांद्या शेंड्याकडून खाली वाळतात. खोडाचा उभा छेद घेतल्यास त्याचा मधला भाग संपूर्ण तपकिरी, काळा पडल्याचे आढळून येते. रोगाचा प्रसार रोगग्रस्त बियाणे व जमिनीतील बुरशीच्या बिजाणूंपासून होतो.
🛡️उपाययोजना
जमिनीची उन्हाळ्यामध्ये खोल नांगरट करावी. मर रोगाची बुरशी नष्ट होण्यासाठी जमीन चांगली तापू द्यावी. मर रोगाचा प्रादुर्भाव झालेल्या शेतामध्ये पाच ते सहा वर्षांपर्यंत तुरीची लागवड करू नये. पिकांची फेरपालट करावी. मर रोगास प्रतिकारक्षम वाणांची निवड करावी. पेरणीपूर्वी प्रतिकिलो बियाण्यास ५ ग्रॅम ट्रायकोडर्माची बीजप्रक्रिया करावी. तुरीत ज्वारी, बाजरी, मका यासारख्या तृणधान्यांचे आंतरपीक घ्यावे. रोगग्रस्त झाडे उपटून नष्ट करावीत. रोगाच्या नियंत्रणासाठी, प्रादुर्भावग्रस्त क्षेत्रामध्ये रोपांभोवती कार्बेन्डाझिम (५० डब्ल्यूपी) १ ग्रॅम प्रतिलिटर पाणी प्रमाणे आळवणी करावी.
कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.