कारली पिकातील फळमाशी नियंत्रण.

 वेल वर्गीय पिके

फळमाशी ही फळांच्या वरील पापुद्र्यात अंडी घालते. त्यातून बाहेर पडलेल्या अळ्या फळात राहून गर खातात. त्यामुळे फळे सडतात, वेडीवाकडी होतात आणि अकाली पक्व होतात.
🛡️उपाययोजना
👉फळांची काढणी योग्य पक्वतेस करावी. 
👉परादुर्भावग्रस्त फळांमधून फळमाशीची उत्पत्ती वाढत असल्याने अशी फळे गोळा करून नष्ट करावीत.
👉फळमाशीची कोषावस्था मातीत २ ते ३ सें.मी. खोलीपर्यंत आढळते. त्यामुळे वेलांखालील माती वेळोवेळी हलवून घ्यावी, जेणेकरून कोष उघडे पडून सूर्यकिरणे व पक्षांद्वारे त्यांचे नियंत्रण होईल.
👉विशेषतः नरमाशीच्या नियंत्रणासाठी क्यू ल्युरचे एकरी ५ कामगंध सापळे लावावेत. सापळे लावल्यामुळे शेतातील नर फळमाशीचे प्रमाण कमी होते. मादी माशीला मिलनासाठी नरांची उपलब्धता कमी होते, परिणामी मादी नराच्या शोधात अन्य ठिकाणी जातात किंवा अंडी फलीत न होण्याचे प्रमाण वाढते.
👉फळमाशीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास, नियंत्रणासाठी मॅलॅथिऑन (५० ईसी) २ मि.लि. अधिक गूळ १० ग्रॅम प्रतिलिटर पाणी या विषारी अमिषाची फवारणी करावी.

कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.

Post a Comment (0)
Previous Post Next Post