भुईमुग तन व्यवस्थापन तसेच सुर्यफुल खत नियोजन.

 भुईमुग


भुईमुगाचे पीक ४५ दिवसांपर्यंत तणविरहित ठेवण्यासाठी दोन खुरपण्या १५ ते २० दिवसांच्या अंतराने व दोन कोळपण्या १० ते १२ दिवसांच्या अंतराने कराव्यात. ३५ ते ४० दिवसांनंतर आऱ्या सुटू लागल्यानंतर कोणतेही आंतरमशागतीचे काम करू नये. फक्त मोठे तण उपटून टाकावे, म्हणजे शेंगा पोसण्याचे प्रमाण वाढेल. तणनाशकाचा वापर करून खुरपणी व दोन कोळपण्या दिल्या, तर तणांचा चांगला बंदोबस्त होतो. यासाठी पेरणीनंतर ४८ तासांत ओलीवर, पेंडीमिथॅलिन (३० इसी) ५ मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. किंवा पेरणीनंतर २० दिवसांनी, इमॅझिथापर (१० एसएल) २ मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.


सुर्यफुल



पीक सुमारे २० दिवसांचे असताना एक आणि ३० ते ३५ दिवसांचे असताना दुसरी कोळपणी करावी. तणांचे प्रमाण जास्त असल्यास एखादी खुरपणी करावी. आंतरमशागतीमुळे जमिनीत हवा खेळती राहून पिकाची वाढ जोमाने होते. पेरणीनंतर, परंतु पीक व तण उगवणीपूर्वी प्रति एकरी पेंडीमिथॅलीन (३० ईसी) ४०० ते ६०० मि.लि. प्रति २५०-३०० लिटर पाणी या प्रमाणात जमिनीवर फवारणी करावी. फवारणी करताना जमिनीमध्ये पुरेसा ओलावा असावा. तणनाशकांच्या एका फवारणीनंतर किंवा पेरणीनंतर ३५ दिवसांनी कोळपणी केल्यास तण नियंत्रण होते.


कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.

 

Post a Comment (0)
Previous Post Next Post