डाळिंब बागेत सिंचन व्यवस्थापन आणि केळी मृगबहारातील सल्ला.

 डाळिंब


डाळिंब बागेत सिंचनासाठी ठिबक किंवा सूक्ष्म सिंचन प्रणालीचा वापर करावा. डाळिंब बागेत लागवडीच्या पहिल्या दोन वर्षांपर्यंत एका ओळीसाठी एक लॅटरल आणि प्रति झाडासाठी दोन ड्रीपर्स असावेत. पुढे तिसऱ्या व चौथ्या वर्षासाठी दोन लॅटरल आणि चार ड्रीपर्स आणि पाचव्या वर्षापासून पुढे झाडांच्या वाढलेल्या आकारानुसार दोन लॅटरल आणि सहा ड्रीपर्स असे नियोजन करावे. यातून पाण्याची गरजेची पूर्तता करणे शक्य होते.


केळी 



मृगबहारातील लागवड जून ते जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत करावी. लागवड उशिरा म्हणजेच ऑगस्टपर्यंत केल्यास, घड निसवण्याचा कालावधी मार्च-एप्रिलमध्ये येतो. या काळात अधिक तापमान आणि कमी आर्द्रतेमुळे घड अडकण्याची, तसेच व्यवस्थित पोसले न जाण्याची शक्यता जास्त असते. महाराष्ट्रातील प्रमुख केळी लागवड क्षेत्रात उन्हाळ्यात सरासरी तापमान ४२ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक असते. या दृष्टीकोनातून केळीची लागवड शिफारस केलेल्या १.५ x १.५ मीटर अंतरावर करावी. शिफारशीपेक्षा अधिक अंतरावर लागवड केल्यास घड सटकणे आणि झाडे उन्मळून पडण्याचे प्रमाण वाढते.




कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.

Post a Comment (0)
Previous Post Next Post