सौजन्य : 🏛 वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, मांजरी,ता. हवेली, जि. पुणे
भारतात ऊस हे अत्यंत महत्वाचे पीक असून, साखर उद्योग हा ग्रामीण भारतातील लक्षावधी लोकांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे रोजगार पुरवणारा मोठा व्यवसाय आहे. भारतासारख्या कृषिप्रधान देशाला आर्थिक उत्पन्न मिळवून देणारा आणि भविष्यात देशाची उर्जेची गरज भागवणारा शाश्वत पर्याय आहे. एकंदरीत लक्षात घेता उसाचे उत्पादन हे ठराविक टप्प्यावर स्थिर किंबहुना कमी कमी होताना दिसते आहे.
ऊस हे शेतात दीर्घकाळ राहणारे पीक आहे. त्यामुळे उसावर विविध जैविक आणि अजैविक ताणांचा प्रभाव पडतो. अधिकाधिक उत्पन्न घेण्याकरिता रासायनिक खते आणि पाणी यांचा अमर्याद वापर केला जातो, त्यामुळे जमिनीची प्रत खालावत आहे. जमिनीतील सेंद्रिय कर्ब अत्यंत कमी झाला आहे. जमिनीचा आणि पाण्याचा सामू वाढला आहे. या सगळ्यामुळे जमिन खारवट चोपण बनून नापीक होऊ लागली आहे. उसावर विविध कीड व रोग यांचा प्रादुर्भाव वाढून उत्पन्न घटू लागले आहे.
वारंवार येणाऱ्या अडचणी आणि उपलब्ध नैसर्गिक संसाधने या दोन्हींचा मेळ घालून ऊस शेती ही शाश्वत आणि किफायतशीर कशी करता येईल याचा विचार शेतकरी बंधू-भगिनींनी करायला हवा. यासाठी रासायनिक खते, कीडनाशके यांवरचे अवलंबित्व कमी करून विविध जीवाणू खते, जैविक कीड आणि रोगनाशके आणि जैवसंजीवके यांचा वापर करून शाश्वत ऊस शेती केली पाहिजे.
कृषिसंस्थेमध्ये जैविक नियमन यंत्रणा, वनस्पती आणि सूक्ष्म जीवजंतू यांच्या परस्परपूरक क्रियांचा समावेश असतो. यातील विविध संरचनेपैकी नाविन्यपूर्ण जैवसंजीवक संकल्पनेवर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पुणे आणि भाभा अणुसंशोधन केंद्र, मुंबई यांनी संशोधन करून 'वसंत उर्जा' हे जैवसंजीवक शाश्वत शेतीकरिता एक बहुउपयोगी निविष्ठा निर्माण केली आहे. हे सर्व पिकांच्या अजैविक ताण म्हणजे पाण्याची कमतरता, तीव्र तापमान, अति थंडी अथवा रोग व किडी इ. नियंत्रणाकरिता अतिशय उपयुक्त असल्याचे दिसून आले आहे.
प्रथम आपण 'जैव संजीवक’ ही संकल्पना थोडक्यात समजून घेऊ. जैव संजीवक हे विशिष्ट प्रकारच्या वनस्पती तथा प्राणीजन्य अथवा सेंद्रीय-असेंद्रीय घटक किंवा वेगवेगळी जीवाणू खते, जैविक कीड/रोग नियंत्रण करणारे सूक्ष्म जीवाणू इ. घटक होत. उदा. ह्युमिक अॅसिड, फॉलिक अॅसिड, समुद्री शेवाळ अर्क, जीबरेलिक अॅसिड, सॅलिसिलीक अॅसिड इ.
यांच्या संपर्कात वनस्पती पेशी आल्या असता त्या पेशींचे उद्दीपन होऊन पेशींमध्ये विविध संवेदना जागृतीचे काम करतात. ज्यामुळे वनस्पती पेशीअंतर्गत उपयोगी जैवरासायनिक अभिक्रियांचा वेग वाढून जैविक (रोग व किडी) आणि अजैविक ताण (पाण्याचा तुटवडा, प्रखर सूर्यप्रकाश, अति शीत वा तीव्र तापमान, जमिनीची क्षारता) यांमुळे होणारे नुकसान टाळले जाते.
वसंत ऊर्जा या जैव संजीवकाच्या प्रायोगिक चाचण्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, भाभा अणुसंशोधन केंद्र, मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगांव आणि महात्मा फुले कृषि विद्यापीठ यांच्यामार्फत घेऊन त्याचे निष्कर्ष महाराष्ट्रातील चारही विद्यापीठांच्या संयुक्त कृषि संशोधन समितीपुढे मांडण्यात येऊन त्याची शिफारस करण्यात आली आहे.
अधिक वाचा 'कृषिक तज्ञ'मध्ये.....
कृषिज्ञाचे मार्गदर्शन व कृषि विषयक सल्ला मिळवण्यासाठी आजच खालील बटन वर क्लिक करून कृषिकअॅप अपडेट / डाऊनलोड करा 📲📲

वसंत ऊर्जा ऐक लिटर मिळेल का...
ReplyDelete