तंत्र आडसाली ऊस लागवडीचे : भाग - १ 🎋🎋


 
श्री. संतोष करंजे, विषय विशेषज्ञ (कृषिविद्या), 🎋🎋
      कृषि विज्ञान केंद्र, बारामती

आडसाली हंगामातील पिकाला हवामानाचे घटक अनुकूल असल्याने वाढ जोमदार होते. आडसाली ऊस पीक वाढीच्या (१६ ते १८ महिने) काळात दोन पावसाळी हंगामाचा फायदा मिळाल्याने सुरू हंगामाच्या दीडपट उत्पादन मिळते.
आडसाली ऊस लागवड जुलै मध्यापासून १५ ऑगस्टपर्यंत करता येते. या काळात लागवडीसह खत व पाण्याचे नियोजन योग्य प्रकारे केल्यास उत्पादकतेमध्ये वाढ मिळते.
जमीन व पूर्वमशागत :
- मध्यम ते भारी (४५ ते ६० सें.मी. किंवा त्याहून खोल) आणि उत्तम निचऱ्याची जमीन निवडावी.
- उन्हाळ्यात जमिनीची उभी आडवी अशी दोनवेळा खोल नांगरट करावी. ढेकळे फोडून आवश्यकतेनुसार १ ते २ कुळवाच्या पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी.
- रिजरच्या सहायाने हलक्या जमिनीत ९० सें.मी., मध्यम जमिनीत १०० सें.मी. आणि भारी जमिनीत १२० सें.मी. अंतरावर सऱ्या पाडाव्यात.
- पट्टा पद्धतीसाठी २.५ ते ५ किंवा ३ ते ६ फूट अशा जोड ओळ पद्धतीने लागवड करावी.
- यांत्रिक पद्धतीचा (पॉवर टिलर) वापर करावयाचा असल्यास दोन सरीतील अंतर १२० सें.मी. (चार फूट) ठेवावे. ऊस तोडणी यंत्राच्या सहाय्याने करणार असल्यास दोन ओळीतील अंतर १५० सें.मी. ठेवावे. यामुळे आंतरमशागत ट्रॅक्‍टरने व ऊस तोडणी यंत्राचा वापर सुलभ होतो.
जातींची निवड :
को ८६०३२, फुले २६५, को व्हीएसआय ९८०५
           संपूर्ण वाचण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा  👇👇
                                          
       

   
Post a Comment (0)
Previous Post Next Post