ठिबक सिंचन
👉🏽 मुळांशी योग्य ओलावा राखल्याने लवकर, एकसमान उगवण होऊन वाढ जोरदारपणे होते.
👉🏽 पाणी, अन्नद्रव्ये कार्यक्षम मुळाच्या कक्षेत दिल्याने पुरेपूर वापर होतो.
👉🏽 पाणी ५०%, खत ३०%, वीजेमध्ये ४०% आणि मजुरीमध्ये ३०% बचत होते. उत्पादनात ३५-४०% वाढ होते.
👉🏽 कंद, कायिक वाढीवर नियंत्रण शक्य होते. जमिनीतील पाणी, हवा यांचा समतोल राखला जातो.
👉🏽 ठिबक सिंचनाद्वारे पाणी सुरु असतानाही भरणी, फवारणी सहज करता येते.
👉🏽 दाब नियंत्रित ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करून चढ-उताराची जमीन लागवडीखाली आणता येते.
👉🏽 उत्पादनात ३५ ते ४० टक्के वाढ होते.
👉🏽 इनलाइन ड्रीप पद्धती वापरावी. सर्व ठिकाणी समप्रमाणात पाणी देणाऱ्या दाब नियंत्रित ड्रीपरचा वापर करावा. शेतात सर्व ठिकाणी सारख्या प्रमाणात पाणी व खते मिळण्यासाठी जमिनीच्या प्रकारानुसार ठिबक नळीतील अंतर, ड्रीपरमधील अंतर आणि ड्रीपरचा ताशी प्रवाह खालीलप्रमाणे असावा.
जमिनीचा प्रकार--- हलकी जमीन --- मध्यम जमीन --- भारी जमीन
ठिबक नळीतील अंतर --- ४ फूट --- ४.५ फूट --- ५ फूट
ड्रीपरमधील अंतर --- ३० सें.मी. --- ४० सें.मी. --- ५० सें.मी.
ड्रीपरचा ताशी प्रवाह --- १ लिटर/ तास --- २ लिटर/ तास --- २ ते ३ लिटर/ तास
💧पाणी व्यवस्थापन
ठिबक सिंचनासाठी पाण्याची गरज
पाण्याची गरज (मि.मी.) = बाष्पीभवन (मि.मी./ दिन) × पीक गुणांक × बाष्पपात्र गुणांक
एकरी पाण्याची गरज = क्षेत्रफळ (चौ. मीटर) × प्रतिदिन पाण्याची गरज
➖➖➖

