ऑक्टोबर हीट
दुपारच्या वेळी साधारणतः तापमान ३५ अंश सेल्सिअसच्या वर गेल्यानंतर हळदीची पाने गोलाकार झालेली दिसतात. हा कोणताही रोग नसून, जास्त उन्हापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी पिकाची नैसर्गिक क्रिया आहे. अशी पाने तापमान कमी झाल्यानंतर पुन्हा सरळ होतात.

