पूर परिस्थितीमधील जनावरांचे कसे करावे व्यवस्थापन


पूर परिस्थितीमधील जनावरांचे व्यवस्थापन

महापुराच्या प्रलयामुळे जनावरांचे आरोग्य अडचणीत येते. पुराच्या पाण्याची पातळी वाढायला लागल्यावर विषारी कीटक, साप इत्यादिच्या दंशाने जनावरे दगावण्याची शक्यता असते. जास्त वेळ खाद्य व पाणी न मिळाल्याने जनावरांची उपासमार होते. पूरस्थिती निवळल्यावर विविध संसर्गजन्य आजारांच्या साथी बाधित भागामध्ये शिरकाव करून त्यातून जनावरांना मोठ्या प्रमाणात बाधा होऊन आजारी पडतात.

💠जनावरांचे व्यवस्थापन

👉🏽बाधित क्षेत्रातून जनावरांना सुरक्षित ठिकाणी ठेवावे. निवारा, चारा व स्वच्छ पाण्याचे नियोजन करावे.

👉🏽विद्युत पुरवठा करणाऱ्या खांबाना जनावरे बांधू नयेत.

👉🏽दुधाळ जनावरे, गाभण जनावरे, वासरे यांना त्यांच्या गरजेप्रमाणे संतुलित आहार उपलब्ध करून द्यावा.

👉🏽दुषित पाण्यात भिजलेले अथवा भिजवलेले पशुखाद्य आणि वैरण जनावरांना खाऊ घालू नये.

👉🏽आजारी जनावरांना गरजेनुसार योग्य औषधोपचार करावा.

👉🏽वातावरणातील अचानक झालेल्या बदलामुळे जनावरांवर ताण येतो. त्याचवेळी साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव वाढतो. अशा परिस्थितीत आजारांसाठी (घटसर्प, फऱ्या, लाळ्या-खुरकत) प्रतिबंधात्मक लसीकरण करावे.

👉🏽काही ठिकाणी डास, कीटकांचा प्रादुर्भाव असल्यास कडूनिंबाचा पाला व शेणाच्या गोवऱ्या पेटवून धूर करावा, जेणेकरून जनावरांचे कीटकांपासून संरक्षण होईल.

👉🏽सर्व जनावरांना आहारात नियमित खनिज क्षार मिश्रण द्यावे.

👉🏽सर्व जनावरांचे जंत निर्मूलन व गोचीड निर्मूलन करून घ्यावे.

👉🏽पुराच्या पाण्यात बुडून मृत्युमुखी पडलेली जनावरे जमिनीत गाडून तत्काळ विल्हेवाट लावावी. जेणेकरून दुर्गंधी व संसर्गजन्य आजारांचा प्रादुर्भाव वाढणार नाही.

➖➖➖

 पिक सल्ला आणि समस्या,कृषी योजना माहिती कृषी बातम्या,खतसाठा ,माहितीसाठी आणि राज्यातील प्रमुख बाजारपेठेतील पिकांचे बाजारभाव व मोफत गावनिहाय हवामान अंदाज माहिती.  कृषिक अॅप नक्की खालील (प्ले स्टोअरच्या) बटन  वरुन डाउनलोड करा.  📱📱📱


Post a Comment (0)
Previous Post Next Post