अतिवृष्टीग्रस्त केळी बागेचे व्यवस्थापन
हे पीक २४ ते ४८ तासापर्यंत बागेत साचलेले पाणी सहन करू शकते. मात्र त्यापुढील काळात मुळांना ऑक्सिजन न मिळाल्यास ती कुजायला लागतात. याचा परिणाम पानांवर होऊन ती पिवळी पडतात. अशा परिस्थितीमध्ये बागेतून पाण्याचा निचरा लवकर करणे आवश्यक आहे. पाण्याचा निचरा केल्यानंतर कार्बेन्डाझिम २ मि.लि. किंवा प्रोपीकोनॅझोल २ मि.लि. प्रति लिटर पाण्यात मिसळून या द्रावणाची झाडाच्या बुडा लगत आळवणी करावी. झाडांची मुळे अन्नद्रव्य शोषून घेण्यासाठी सक्षम होईपर्यंत झाडांवर १९:१९:१९ या विद्राव्य खताची (२० ग्रॅम प्रति १५ लिटर पाणी) फवारणी करावी.
➖➖➖

