अतिवृष्टीनंतर कपाशीचे कसे कराल व्यवस्थापन


अतिवृष्टीनंतर कपाशीचे व्यवस्थापन

👉🏽जमिनीमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असताना किंवा जमिनीत पाणी साचलेले असताना केलेल्या उपाययोजना तितक्या फलदायी ठरत नाहीत. त्यामुळे लवकरात लवकर पाण्याचा निचरा करून जमीन कोरडी करण्यावर भर द्यावा.

👉🏽पाण्याचा निचरा होण्यासाठी उताराला समांतर चर काढून साचलेले पाणी शेताबाहेर काढावे.

👉🏽वरंब्यावर कपाशीची लागवड केलेली असल्यास अतिरिक्त पाणी सरीमधून निघून जाण्यासाठी शेतात खोदलेले चर मोकळे करावे.

👉🏽सखल भागातील पाण्याला वाट करून द्यावी. शक्य असल्यास साचलेले पाणी बाहेर उपसावे.

👉🏽पिकातील अतिरिक्त पाण्याचा तात्काळ निचरा करावा.

👉🏽वाफसा येताच कोळपणी व खुरपणी करावी.

👉🏽पोषणासाठी कपाशी झाडावर १९:१९:१९ किंवा डी.ए.पी. १० ग्रॅम प्रति लिटर (१%) याप्रमाणात सात दिवसांच्या अंतराने फवारणी घ्यावी.

👉🏽अन्नद्रव्यांचे काळजीपूर्वक व्यवस्थापन करावे.

👉🏽कपाशीची झाडे शेंडा खुडण्याच्या अवस्थेत असल्यास शेंडा खुडण्याचे काम आठवड्याने लांबवावे. पाणी साचल्यामुळे झाडाची वाढ मंद झालेली असते. अशा परिस्थितीत शेंडा खुडल्यामुळे अपेक्षित असलेली फळफांद्यांची वाढ व बोंडाच्या वजनातील वाढ मिळत नाही.

👉🏽या हंगामात अति पावसामुळे गंभीर परिस्थिती न   र्माण झाली असली, तरी अन्य पिकांच्या तुलनेने कापूस लवचिक वनस्पती आहे. या काळात झाडांतील संप्रेरकांची पातळी बदललेली असते. त्यामुळे एन.ए.ए. किंवा अन्य कोणत्याही संप्रेरकाच्या फवारणीची घाई करू नये. संप्रेरकांचा खूप लवकर वापर केल्यास उत्पादनात घट येते. एकदा माती सुकली आणि सूर्यप्रकाश मिळाला की कपाशी पीक सामान्यपणे पुन्हा वाढू लागेल. पोषकतेच्या बहुतांश समस्या अनेकदा दूर होतात.

👉🏽या काळात आकस्मिक मर, पातेगळ, बोंडसड यांसारख्या समस्या उद्भवतात. त्यांच्या निराकरणासाठी उपाययोजना कराव्या.

➖➖➖

कापूस पिक सल्ला आणि समस्या,कृषी योजना माहिती कृषी बातम्या,खतसाठा ,माहितीसाठी आणि राज्यातील प्रमुख बाजारपेठेतील पिकांचे बाजारभाव व मोफत गावनिहाय हवामान अंदाज माहिती.  कृषिक अॅप नक्की खालील (प्ले स्टोअरच्या) बटन  वरुन डाउनलोड करा.  📱📱📱


Post a Comment (0)
Previous Post Next Post