महाडीबीटी शेतकरी योजना या पोर्टल द्वारे कृषि विभागाकडून कृषी यांत्रिकीकरण घटक साठी महाडीबीटी पोर्टल वर ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जातात. आणि या ऑनलाइन प्राप्त अर्जामधून महाडीबीटी पोर्टल द्वारे सोडत काढली जाते. कृषि यांत्रिकीकरण सोडत यादी मध्ये ट्रॅक्टर, पेरणी यंत्र, नांगर, पॉवर टिल्लर, कडबा कटर, इत्यादि अनेक कृषि औजारांसाठी लाभार्थ्यांची निवड करण्यात येते.
महाडीबीटी सोडत यादी मध्ये ज्या लाभार्थ्याची निवड झालेली आहे त्यांनी महाडीबीटी पोर्टल वर ● 7/12, होल्डिंग,
● निवड झालेल्या यंत्राचे कोटेशन,
● आणि टेस्ट रीपोर्ट,
तसेच ट्रॅक्टर चलित औजारे असतील तर
● निवड झालेल्या व्यक्ति चे आरसी बूक अपलोड करावे लागते आणि त्यानंतर पूर्वसंमती आणि पुढे अनुदान रक्कम अदा करणे असे टप्पे महाडीबीटी मध्ये आहेत. (Mahadbt Farmer Schemes)
दिनांक 25 फेब्रुवारी 2025 रोजी कृषि यांत्रिकीकरणाची ही सोडत काढण्यात आली आहे.
ट्रॅक्टर चलित औजारांसाठी निवड झालेल्या व्यक्तीच्या नावाने ट्रॅक्टर असणे आवश्यक आहे आणि जर ट्रॅक्टर हे निवड झालेल्या व्यक्तीच्या नावाने नसेल तर कुटुंबातील सदस्यांच्या नावाने असणे आवश्यक आहे. (येथे कुटुंब म्हणजे आई, वडील आणि त्यांचे अविवाहित अपत्य)
दिनांक 25 फेब्रुवारी 2025 रोजीची कृषि यंत्र/औजारे सोडत यादी पहाण्यासाठी खालील पर्याय निवडावा 👇🏽👇🏽
कृषि यांत्रिकीकरण लॉटरी यादी सर्व जिल्हे : येथे डाऊनलोड करा