काढणीपश्चात कमी नुकसानीच्या दृष्टीने घड कापणी
👉🏽केळी घडांची कापणी सकाळी किंवा सायंकाळी करावी.
👉🏽केळीच्या घडाची कापणी नेहमी दोन व्यक्तींच्या गटाद्वारे करावी.
👉🏽पक्व घडांची कापणी धारदार कोयत्याने करावी. घड कापताना फण्यापासून ३० सें.मी. लांब दांडा ठेवून घड कापावा म्हणजे वाहतुकीला सोईचे होते.
👉🏽एकमेकांना घासून घडातील फण्यांना इजा होऊ नये म्हणून घड कापणीपूर्वी दोन फण्यांमध्ये कुशनचे पॅकिंग वापरावे.
👉🏽कापणीनंतर वाहून नेताना २५ ते ३० किलो वजनामुळे केळीच्या घडाचा दांडा खाली वाकून जातो. यासाठी घड एकाने कापावा तर दुसऱ्याने आपल्या खांद्यावर टाकलेल्या फोमच्या कुशनवर अलगद उचलून १० ते १२ सें.मी. जाडी असलेल्या केळीच्या पानांच्या थरावर किंवा फोमच्या कुशनवर हळुवार पद्धतीने ठेवावा.
👉🏽केळीच्या पानांच्या थरावर घड ठेवताना घडाचा एक फूट लांबीचा दांडा वरच्या दिशेने राहील याची काळजी घ्यावी. दांड्याच्या कापलेल्या टोकापासून चिकट स्राव बंद झाल्यानंतर घडाला हिरव्या पानाने पॅकिंग करून पॅकिंग शेडमध्ये करावी.
👉🏽घडाची व्यवस्थित हाताळणी होण्यासाठी प्रत्येक शेताच्या बांधावर हाताळणी केंद्र असावे.
➖➖➖
राज्यातील प्रमुख बाजारपेठेतील पिकांचे बाजारभाव व मोफत गावनिहाय हवामान अंदाज माहिती. केळी पिक सल्ला आणि समस्या,कृषी योजना माहिती कृषी बातम्या,खतसाठा ,माहितीसाठी कृषिक अॅप नक्की खालील (प्ले स्टोअरच्या) बटन वरुन डाउनलोड करा. 📱📱📱