बारामतीत १८ पासून कृषिक प्रदर्शन

दिनांक : 11-Jan-24

सौजन्य : सकाळ 

जगविख्यात संस्थाच्या माध्यमातून ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामतीत विविध उपक्रम राबवत आहे. त्यातून होणारे प्रयोग शेतकऱ्यांसाठी दिशदर्शक ठरतील . असे मत ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार यांनी व्यक्त केले. 

ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्रामार्फत बारामती-शारदानगर येथे कृषिक हे जागतिक स्थरावरील शेती विषयक प्रात्यक्षिके युक्त कृषिक २०२४ हे कृषी प्रदर्शन १७० एकर 

प्रक्षेत्रावर गुरुवार (ता . १८ ) ते सोमवार (ता. २२ ) जानेवारी या कालावधी आयोजित केले आहे. याबाबत ते पुढे म्हणाले कि ,

     प्रदर्शनात यंदाचे मुख्य आकर्षण

- देशात पहिले फार्म ऑफ द फ्युचरची उभारणी,कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधरे वाढवलेला उस व लाल भेंडी,स्टोबेरी,मिरची,भोपळा,चेरी टोमॅटोअशीविविध पिके पाहायला मिळणार,क्लस्टर आधारित प्रात्याक्षिके,भाजीपला गुणवत्ता केंद्रातील अद्यावत माहिती, नाविन्यपूर्ण शेती तंत्रज्ञान,नैसर्गिक शेतीचे प्लॉट,आधुनिक पशु-पक्ष्यांचे प्रदर्शन,देशी बियाण्याचे प्रात्याक्षिके,फुल शेती-ऑर्किडचे विविध १५ प्रकारचे भरडधान्य ओळख आणि प्रात्याक्षिके

कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी करण्यासाठी ऑक्सफर्ड विद्यापीठ लंडन,मायक्रोसॉफ्ट कंपनी,ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट,महाराष्ट्र  शासन कृषी विभाग,नाबार्ड आदि 

संस्था एकत्र आलेलो आहोत. आमचे संशोधन,तंत्र व संकल्पना प्रत्यक्षात कसे कार्य करते. हे येत्या कृषिक २०२४ या प्रदर्शनातून सर्वाना बघण्यास मिळणार आहे अशी माहिती ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार यांनी दिली या प्रदर्शनातून 

बहुसंख्य शेतकरी,शात्रज्ञ,अधिकारी आणि उद्योजकांना कृषी क्रांतीची नवीन दिशा मिळणार आहे, असे पवार यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले यंदाच्या प्रदर्शनामध्ये २०हून अधिक देशातील तंत्रज्ञान शेतकऱ्यांना पहावसयास मिळणार आहे.त्यामध्ये नेदरलँड्स,चीन,अमेरिका,इस्त्राइल,ब्राझील,स्पेन,इटली,जर्मनी,आफ्रिका,फ्रान्स,थायलंड,न्यू हॉलंड,कोरियाजपान,इंग्लंड(uk),मेक्सिको,

स्विडन,तुर्की, ऑस्ट्रेलिया आदी देशांचा समावेश आहे. यावेळी मुख्यकार्यकारी अधिकारी प्रा. निलेश नलावडे म्हणाले,कि जगभर उपलब्ध असलेले अत्याधुनिक तंत्रज्ञान केवळ बारामती नव्हे. तर देशातील  शेतकऱ्यांच्या दारात नेण्याचे आमचे प्रयत्न आहेत. या तंत्र वापराचे माध्यम सहजसोपे असावे व ते प्रादेशिक भाषामधून उपलब्ध व्हावे असे आमचे उद्दिष्ट आहे. यावेळी कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख धीरज शिंदे उपस्थित होते.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📱📱 कृषिक प्रदर्शन २०२४ नोंदणी 📱📱

त्वरित आपली नोंदणी खाली दिलेल्या लिंक वरून(कृषिक अॅप) सवलतीचा लाभ घ्यावी. 📱📱

https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&hl=en_IN&gl=US

Post a Comment (0)
Previous Post Next Post