सद्यस्थितीतील कीड व्यवस्थापन
सध्याच्या ढगाळ वातावरणामध्ये तूरीवर शेंगा पोखरणार्या अळीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. तसेच शेंगमाशीचा प्रादुर्भाव झाल्यास तुरीमध्ये अडकण होऊ शकते.
👉🏽 शेंगा पोखरणार्या अळीच्या नियंत्रणाकरीता,
पूर्ण वाढ झालेल्या अळ्या वेचून नष्ट कराव्यात.
शेतामध्ये इंग्रजी ‘T’ आकाराचे प्रति एकरी २० पक्षीथांबे लावावेत, जेणेकरून पक्ष्यांद्वारे अळ्या वेचून खाल्याने प्रादुर्भाव कमी होईल.
तुरीच्या झाडाखाली पोते टाकून झाड हलवावे आणि पोत्यावर पडलेल्या अळ्या वेळोवेळी जमा करून नष्ट कराव्यात.
अळीची आर्थिक नुकसान पातळी समजण्यासाठी प्रति एकरी २ कामगंध सापळे लावावेत.
किडीने आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडल्यास, (फवारणी प्रति लिटर पाणी)
इमामेक्टिन बेंझोएट (५ एसजी) ०.४ ग्रॅम किंवा स्पिनोसॅड (एससी) ०.३ मि.लि. किंवा इंडोक्झाकार्ब (१४.५ एससी) ०.८ मि.लि. किंवा क्लोरॲण्ट्रानिलीप्रोल (१८.५ एससी) ०.३ मि.लि. किंवा फ्लुबेंडामाईड (२० डब्ल्यूजी) ०.५ ग्रॅम किंवा क्लोरॲण्ट्रानिलीप्रोल (९.३%) + लॅमडा सायहॅलोथ्रीन (४.६% झेडसी) ०.४ मि.लि.
👉🏽 शेंगमाशीच्या नियंत्रणाकरीता, (फवारणी प्रति लिटर पाणी)
लॅमडा साहॅलोथ्रीन (५ एससी) ०.८ मि.लि. किंवा ल्युफेन्युरॉन (५.४ ईसी) १.२ मि.लि.
➖➖➖
राज्यातील प्रमुख बाजारपेठेतील पिकांचे बाजारभाव व मोफत गावनिहाय हवामान अंदाज माहिती. कापूस व सोयाबीन पिक सल्ला आणि समस्या,कृषी योजना माहिती कृषी बातम्या,खतसाठा ,माहितीसाठी कृषिक अॅप नक्की (प्ले स्टोअरच्या) लिंक वरुन डाउनलोड करा. 📱📱📱