संत्रा-मोसंबी-लिंबू फळ पिकातील कीड नियंत्रण


कीड नियंत्रण 

फळातील रस शोषणारा पतंग - प्रौढ पतंगांना आकर्षित करण्यासाठी २० ग्रॅम मॅलॅथिऑन अधिक २०० ग्रॅम गूळ किंवा फळांचा रस प्रति दोन लिटर पाण्यात मिसळून विषारी मिश्रण तयार करावे. हे मिश्रण एखाद्या प्लॅस्टिक ट्रेमध्ये ठेवून, त्यावर प्रकाशाची व्यवस्था करावी. असे प्रकाश सापळे बनवून बागेत ठेवावेत. गळालेली फळे गोळा करून मातीत दाबून नष्ट करावे. याशिवाय कडुलिंबाच्या ओल्या पानांमध्ये गोवऱ्या टाकून बगीचामध्ये संध्याकाळी सहा ते रात्री दहापर्यंत निरनिराळ्या ठिकाणी धूर करावा.

⭕ फळमाशी - नर फळमाशीला आकर्षित करून नष्ट करण्यासाठी सापळा तयार करावा. त्यासाठी ०.५ मि.लि. मिथाईल युजेनॉल अधिक २ मि.लि. मॅलॅथिऑन किंवा २ मि.लि. क्विनालफॉस प्रति लिटर पाण्यात द्रावण बनवावे. हे द्रावण रुंद तोंडाच्या बाटलीत ठेवून, अशा एकरी १० बाटल्या झाडावर अडकवून ठेवाव्यात. दर ७ दिवसांनी बाटलीतील द्रावण बदलावे.

⭕ कोळी - या कीडीचा प्रादुर्भाव दिसताच, डायकोफॉल (१८.५ ईसी) २ मि.लि. किंवा प्रोपरगाईट (२० ईसी) १ मि.लि. किंवा इथिऑन (२० ईसी) २ मि.लि. किंवा विद्राव्य गंधक ३ ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. आवश्यकता भासल्यास दुसरी फवारणी १५ दिवसांच्या अंतराने घ्यावी.

पाने खाणारी अळी – नियंत्रणासाठी डायमेथोएट (३० ईसी) १.५ मि.लि. किंवा सायपरमेथ्रीन (२५ ईसी) १ मि.लि. प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

अधिक माहितीसाठी आठवडी पिक सल्ला,कृषी वार्ता साठी कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.


Post a Comment (0)
Previous Post Next Post