सोयाबीन पिकातील विषाणूजन्य रोग व्यवस्थापन |पिवळा मोझॅक, हिरवा मोझॅक |

 सोयाबीन

विषाणूजन्य रोग

 पिवळा मोझॅक 

पिवळा मोझॅक

रोगात झाडाचा काही भाग हिरवट तर काही भाग पिवळसर दिसून येतो. शेंड्याकडील पाने पिवळी पडून, आकाराने लहान राहतात. यामध्ये दाणेसुद्धा कमी राहतात. पांढऱ्या माशीद्वारे रोगाचा प्रसार होतो. या रोगाच्या प्रादुर्भावामुळे उत्पादनात ५-९० टक्क्यांपर्यंत घट येते.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

हिरवा मोझॅक 

हिरवा मोझॅक

रोगग्रस्त झाडांची वाढ खुंटलेली दिसते. पाने आखूड, लहान, जाडसर व सुरकुतलेली होतात. अशा झाडांना शेंगा कमी व त्याही सुरकतलेल्या लागतात. शेंगात दाणे कमी व बारीक भरतात. शेंगा भरण्याच्या स्थितीत रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास बियाण्यावरही परिणाम होतो. बियाण्याच्या आवरणाचा रंग बदलून करडा तपकिरी काळपट होतो. या रोगाचा प्रसार मावा किडीद्वारे व बियाण्यापासून होतो. हिरवा मोझॅक रोगाच्या प्रादुर्भावामुळे उत्पादनात २५-५० टक्क्यांपर्यंत घट येते.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🛡 व्यवस्थापन

👉 उगवणीनंतर १० ते १५ दिवसांनी १५x३० सें.मी. आकाराचे एकरी ६० पिवळे चिकट सापळे लावावेत.

👉 पेरणीनंतर २५ दिवसांनी निंबोळी अर्क ५% किंवा ॲझाडिरेक्टिन (१०,००० पीपीएम) ३-५ मि.लि. प्रतिलिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.

👉 शिफारशीप्रमाणे संतुलीत खताची मात्रा द्यावी. नत्राचा अतिरीक्त वापर टाळावा.

👉 शेत, बांधावरील तणे काढून नष्ट करावीत.

👉 सुरवातीला अत्यल्प प्रमाणात असलेली रोगग्रस्त झाडे दिसताच उपटून टाकावीत.

👉 मित्र कीटकांचे संवर्धन करावे.

👉 उन्हाळी सोयाबीन पीक घेऊ नये.

👉 रोग प्रसार करणाऱ्या रसशोषक किडींच्या नियंत्रणासाठी, बीटा सायफ्लुथ्रिन (८.४९%) + इमिडाक्लोप्रीड (१९.८१% ओडी) ०.७ मि.लि. किंवा थायमिथोक्झाम (१२.५%) + लॅमडा सायहॅलोथ्रीन (९.५% झेडसी) ०.२५ मि.लि. प्रतिलिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

अधिक माहितीसाठी आठवडी पिक सल्ला,कृषी वार्ता साठी कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.


Post a Comment (0)
Previous Post Next Post