संत्रा-मोसंबी-लिंबू रोग व्यवस्थापन

 संत्रा-मोसंबी-लिंबू

रोग व्यवस्थापन

👉 डिंक्या

मे महिन्यात झाडांच्या बुंध्यांना बोर्डो पेस्ट लावलेली नसल्यास, या महिन्यात बोर्डो पेस्ट लावून घ्यावी. यामुळे संत्र्यावरील डिंक्या रोगाला आळा बसतो.

बोर्डो पेस्ट तयार करण्याकरिता - १ किलो चुना व १ किलो मोरचूद प्लॅस्टिक बादल्यामध्ये ५ लिटर पाण्यात रात्रभर वेगवेगळे भिजवावे. दुसऱ्या दिवशी तिसऱ्या प्लॅस्टिक बादलीमध्ये मिश्रण करावे.

👉 खैऱ्या

पावसाच्या पाण्यामुळे लिंबूवरील खैऱ्या रोगाचा प्रादुर्भाव वेगाने पसरतो. याकरिता पावसाळ्याच्या सुरवातीलाच रोगग्रस्त फांद्या, पाने यांची छाटणी करावी. या फांद्या जाळून नष्ट कराव्यात.

झाडांवर कॉपर ऑक्सिक्लोराइड ३ ग्रॅम अधिक स्ट्रेप्टोमायसीन ०.१ ग्रॅम प्रति लिटर पाणी प्रमाणे झाड ओलेचिंब होईपर्यंत फवारणी करावी. झाडाच्या आळ्यातसुद्धा फवारणी करावी.

कीड व्यवस्थापन

👉 सिट्रस सायला

नवीन पालवी फुटल्यानंतर सिट्रस सायलाचा प्रादुर्भाव दिसून येतो. सायलाची पिल्ले व प्रौढ यांच्या नियंत्रणाकरिता, डायमेथोएट २ मि.लि. किंवा इमिडाक्लोप्रिड ०.५ मि.लि. किंवा क्विनॉलफॉस १ मि.लि. किंवा ॲसिफेट १ ग्रॅम किंवा नोव्हॅल्युरान ०.५५ मि.लि. प्रति लिटर पाणी प्रमाणे फवारणी करावी. पुढील फवारणी १० ते १५ दिवसांनंतर कीटकनाशक बदलून करावी.

👉 पाने खाणारी अळी

नियंत्रणाकरिता, सायपरमेथ्रिन (२५ ईसी) १ मि.लि. किंवा प्रोफेनोफॉस २ मि.लि. किंवा ॲसिफेट १ ग्रॅम प्रति लिटर पाणी प्रमाणे फवारणी करावी.

-------------------------------

अधिक माहितीसाठी आठवडी पिक सल्ला,कृषी वार्ता साठी कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.


Post a Comment (0)
Previous Post Next Post