संत्रा-मोसंबी-लिंबू पिकातील रोग व्यवस्थापन

संत्रा-मोसंबी-लिंबू

पीक संरक्षण

रोग व्यवस्थापन 

👉झाडावरील फांद्या कापणीनंतर, कात्रीला सोडियम हायपोक्लोराइट १-२ टक्के द्रावणामध्ये बुडवून निर्जंतुकीकरण करावे.

👉झाडाच्या बुंध्यावर दोन फूट उंचीपर्यंत बोर्डो पेस्ट ब्रशच्या साह्याने लावावी.

👉झाडाच्या बुंध्यामधून डिंक्याचा स्राव सुरू असल्यास, तो तीक्ष्ण चाकूने खरवडून घ्यावा. त्या ठिकाणी मेटॅलॅक्झिल + मॅंकोझेब (संयुक्त बुरशीनाशक) २०० ग्रॅम किंवा फोसेटील ए.एल. २०० ग्रॅम प्रति २५० मि.लि. पाण्यात मिसळून पेस्ट करावी. ही पेस्ट डिंक्या झालेल्या ठिकाणी लावावी.

👉फायटोफ्थोराग्रस्त झाडावर मेटॅलॅक्झिल + मॅंकोझेब (संयुक्त बुरशीनाशक) किंवा फोसेटील ए.एल. २.५ ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे द्रावण तयार करून फवारणी करावी. फवारणी करताना संपूर्ण झाड ओले होईल, असे पाहावे. उर्वरित द्रावणाची झाडाभोवती आळवणी करावी.

कीड व्यवस्थापन

👉खोडकिडा/ ईंडरबेला/ साल खाणारी अळी- अळीने पाडलेल्या छिद्रातील साल काढावी. इंजेक्शनच्या मदतीने क्लोरपायरीफॉस (२० ईसी) ५ मि.लि. प्रति लिटर पाणी याप्रमाणे द्रावण तयार करून छिद्रात टाकावे. कापसाचा बोळा या द्रावणात बुडवून छिद्र बंद करावे.

👉पिठ्या ढेकुण- झाडाभोवतीची जमीन चाळणी करून मोकळी करावी. झाडाच्या खोडाला प्लॅस्टिकच्या पट्ट्या लावून त्यावर ग्रीस लावावे. पिठ्या ढेकुण वाहून नेण्याचे काम मुंग्या करतात, त्यामुळे मुंग्यांची वारुळे बागेमध्ये असल्यास नष्ट करावीत. त्यासाठी क्लोरपायरिफॉस (२० ईसी) ५ मि.लि. प्रति लिटर पाणी हे द्रावण मुंग्यांच्या वारुळातून टाकावे. झाडावर व झाडाच्या बुंध्यावर क्लोरपायरिफॉस (२० ईसी) २ मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.

-------------------------------

अधिक माहितीसाठी आठवडी पिक सल्ला,कृषी वार्ता साठी कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.

Post a Comment (0)
Previous Post Next Post