केळी रोपेनिवड सल्ला

केळी पिक सल्ला 

केळीच्या श्रीमंती, फुले प्राइड यांसारख्या बुटक्या वाणांची लागवड १.५ x १.५ मीटर अंतरावर करावी. तर ग्रॅडनैन या उंच वाढणाऱ्या वाणाची १.७५ x १.७५ मीटर अंतरावर लागवड करावी. योग्य अंतरावर लागवड केल्यामुळे बागेत हवा खेळती राहून झाडे निरोगी राहण्यास मदत होते. दाट लागवडीमुळे सिगाटोका व सीएमव्ही रोगाच्या प्रादुर्भावास अनुकूल वातावरण निर्मिती होते. केळीची लागवड गादीवाफ्यावर करावी. गादीवाफ्यावर लागवड केल्यामुळे मुळांची वाढ चांगली होऊन झाडांची वाढ चांगली होते. त्यामुळे साहजिकच घडांची वाढ चांगली होऊन ते वजनानेदेखील अधिक भरतात. वेळोवेळी बागेत हलकी टिचणी करून झाडांना भर देत रहावे. त्यामुळे वादळी वाऱ्यामुळे झाडे पडण्याचे प्रमाण कमी होते.

केळीची लागवड कंद किंवा उतिसंवर्धित रोपांपासून केली जाते. रोगांच्या प्राथमिक प्रसारास लागवड साहित्य मुख्यतः कारणीभूत ठरते. कंदापासून लागवड करताना कंद निरोगी बागेतून निवडावेत. लागवडीपूर्वी शिफारशीप्रमाणे कंदप्रक्रिया करावी. शेतकऱ्यांचा कल ऊतीसंवर्धित रोपांकडे अधिक आहे. मुळातच उतिसंवर्धित रोपे नाजूक असल्याने ती रोगास सहज बळी पडतात. उतिसंवर्धित रोपांची लागवड करताना रोपे उत्तम दुय्यम कणखरता असलेली व ४ ते ५ पान असलेली निवडावीत. छोटी, कमी पाने असलेली पुरेशी कणखरता नसलेली रोपे लागवडीसाठी निवडू नयेत.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

केळी पिकाचे संतुलित अन्नद्रव्ये व्यवस्थापन”🍌🍌🍌 फेसबुक लाइव्ह Facebook Live च्या माध्यमातून
लाईव्ह ऑन

तारीख - ०९/०६/२०२३
वार- शुक्रवार
वेळ - दुपारी ४ ते ५

नाव नोंदणी पुढे दिलेल्या लिंकवरुन करणे आवश्यक 👇🏼👇🏼👇🏼

https://wa.me/917796622387?text=(कृषिकॲप)+नाव+नोंदणी+करण्यास+इच्छुक+आहे+माझेनाव

Post a Comment (0)
Previous Post Next Post