टोमॅटो पिकातील मर रोग व्यवस्थापन

 टोमॅटो
मर रोग

हा रोग फ्युजॅरियम किंवा व्हर्टिसिलियम नावाच्या बुरशीमुळे होतो. पीकवाढीच्या कोणत्याही अवस्थेत रोगाचा प्रादुर्भाव होतो. कमी सूर्यप्रकाश आणि २१ ते ३३ अंश सेल्सिअस तापमान पोषक ठरते. सुरुवातीला पानाचे देठ गळणे, शिरा रंगहीन होणे ही लक्षणे दिसतात. त्यानंतर झाडाची जुनी खालच्या बाजूची पाने पिवळी पडतात. नवीन पाने तपकरी होऊन कुजतात. त्यामुळे झाडांचा अन्नपुरवठा खंडित होतो. परिणामी, झाडाची वाढ खुंटते. झाड कोलमडून मरते. प्रादुर्भावग्रस्त झाडाच्या खोडावर बुरशीचा गुलाबी थर दिसतो.

🛡 व्यवस्थापन

👉 पिकाची फेरपालट करावी.

👉 वांगी, मिरची व बटाटा या पिकांव्यतिरिक्त इतर पिकांची लागवड करावी.

👉 रोगग्रस्त झाडे, पीक अवशेष गोळा करून नष्ट करावीत.

👉 नत्रयुक्त खतांचा वापर योग्य प्रमाणात करावा.

👉 बी पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया करावी.

👉 निचऱ्याची जमीन निवडावी.

👉 उन्हाळ्यात जमिनीची खोल नांगरट करून जमीन तापू द्यावी.

👉 चांगल्या कुजलेल्या सेंद्रिय खतांचा वापर करावा.

👉 लागवडीवेळी ट्रायकोडर्मा हे जैविक बुरशीनाशक २ किलो प्रति एकर याप्रमाणे शेणखतात मिसळून जमिनीतून द्यावे.

👉पुनर्लागवड करताना रोपांची मुळे ट्रायकोडर्माच्या द्रावणात बुडवून लावावीत.

👉रासायनिक नियंत्रण

थायोफेनेट मिथिल (३८%) + कासुगामायसिन (२.२१% एससी) (संयुक्त बुरशीनाशक) २.५ मि.लि. प्रति लिटर पाणी याप्रमाणे वाफ्यात ओळीलगत आळवणी करावी.

अन्यथा कॉपर ऑक्सिक्लोराइड (५० डब्ल्यूपी) ३ ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे प्रति झाड ५० ते १०० मि.लि. आळवणी करावी.

----------------------------------------------------------------------------------------------------------------

अधिक माहितीसाठी आठवडी पिक सल्ला,कृषी वार्ता साठी कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.


Post a Comment (0)
Previous Post Next Post