कांदा साठवणगृहातील वातावरण

 कांदा

साठवणगृहातील वातावरण

साठवणगृहातील तापमान व आर्द्रता यांचा विचार करणे आवश्यक असते. साठवणगृहात अधिक आर्द्रता (७५ ते ८० टक्के) असल्यास बुरशी लागून कांदा सडतो. आर्द्रता एकदम कमी (६५ टक्क्यांपेक्षा कमी) झाल्यास कांद्याचे उत्सर्जन वाढून वजनात घट येते. साठवणगृहात ६५ ते ७० टक्के आर्द्रता व २५ ते ३० अंश सें.ग्रे. तापमान असले पाहिजे. मे-जून महिन्यात कांदाचाळीतील तापमान अधिक व आर्द्रता कमी असल्यामुळे वजनात घट होते. जुलै-सप्टेंबर दरम्यान आर्द्रता ७५ टक्क्यांपेक्षा जास्त असल्यामुळे सड वाढते. ऑक्टोबर-डिसेंबरमध्ये तापमान कमी झाल्यामुळे कोंब येतात. नैसर्गिक वायुवीजनाचा वापर करून साठवणगृहाची रचना केल्यास तापमान व आर्द्रता काही अंशी मर्यादित ठेवून साठवणुकीतील नुकसान कमी करता येऊ शकते.

----------------------------------------------------------------------------------------------------------------

अधिक माहितीसाठी आठवडी पिक सल्ला,कृषी वार्ता साठी कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.


Post a Comment (0)
Previous Post Next Post