संत्रा-मोसंबी-लिंबू
कीड व्यवस्थापन
⭕ खोड किडा
सर्वप्रथम कीडग्रस्त भागावरील जाळे काढून अळीच्या छिद्राजवळील भाग साफ करावा. नंतर क्लोरपायरीफॉस (२० ईसी) १० मि.लि. प्रति लिटर पाणी याप्रमाणे द्रावण पिचकारीच्या साहाय्याने छिद्रात टाकावे. नंतर छिद्र कापसाच्या बोळ्याने बंद करावे.
⭕ कोळी
कोळी नियंत्रणासाठी, डायकोफॉल (१८.५ ईसी) २ मि.लि. किंवा सल्फर (८० डब्ल्यूडीजी) ३ ग्रॅम किंवा प्रोपरगाईट (५७ ईसी) १ मि.ली. किंवा ईथिऑन (५० ईसी) २ मि.ली. प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. पुढील फवारणी १५ दिवसांनंतर आवश्यकतेनुसार करावी.
⭕ काळी माशी
५० टक्के अंडी फुटल्यानंतर, इमिडाक्लोप्रीड (१७.८ एसएल) ०.५ मि.लि. किंवा अॅसीफेट (७५ डब्लूपी) १.२५ ग्रॅम किंवा डायमिथोएट (३० ईसी) २ मि.लि. प्रति लिटर पाणी याप्रमाणे पानाच्या खालच्या बाजूस संपूर्ण झाड कव्हर होईल अशा पद्धतीने फवारणी करावी. पुढील फवारणी १५ दिवसांच्या अंतराने कीटकनाशक बदलून करावी.
काळ्या माशीच्या प्रादुर्भावामुळे पानावर ‘सुटी मोल्ड’ या बुरशीची वाढ झाल्याचेही आढळते. ही बुरशी संपूर्ण पानांवर पसरते. या बुरशीच्या नियंत्रणासाठी स्टार्च द्रावण २ टक्केच्या फवारणीनंतर कॉपर ऑक्सिक्लोराइड ३ ग्रॅम प्रति लिटर याप्रमाणे फवारणी करावी.
----------------------------------------------------------------------------------------------------------------