केळी खोडवा पिकास ठिबक सिंचनातून विद्राव्य खत व्यवस्थापन


 केळी

केळी खोडवा 

केळीची लागवड केल्यानंतर केळीच्या खोडाभोवती नवीन मुनवे फुटायला लागतात त्यांना पिले अशी संज्ञा आहे. एका केळीच्या झाडाला त्याच्या पूर्ण जीवनचक्रात जातीपरत्वे ६ ते ८ पिले येतात. फक्त एकच पीक घ्यावयाचे असल्यास पिले जसजशी येतील तसतशी कापून टाकावीत, अन्यथा मूळ झाडाची वाढ खुंटते व त्याचा उत्पादनावरही परिणाम होतो. केळीच्या पहिल्या खोडव्यापासून अधिक दर्जेदार उत्पादन घेण्यासाठी पहिले पीक निसवल्यानंतर दोन महिन्यांनी एक जोमदार पिल (मुनवा) सोडावे. त्यामुळे शेतात उभ्या असलेल्या पहिल्या पिकाला सोडलेल्या पिलापासून काही नुकसान होत नाही. मध्यम खोल काळ्या जमिनीत मुख्य केळी पिकाचे घड कापणी केलेले खोड आहे, तसेच ठेवून फक्त पाने कापून त्यांचा आच्छादन म्हणून वापर करावा. त्यामुळे मूळ खोडातील उपयुक्त अन्नद्रव्ये खोडवा पिकास मिळतात. परिणामी कमी खर्चात अधिक व दर्जेदार उत्पादन मिळते. पिल (मुनवा) सोडल्यानंतर पिलास नत्र १५० ग्रॅम, स्फुरद ४५ ग्रॅम व पालाश १५० ग्रॅम अशी खतमात्रा ठिबक सिंचन संचाच्या माध्यमातून द्यावी.

खोडवा पिकास ठिबक सिंचनातून विद्राव्य खत व्यवस्थापन

(हजार झाडांसाठी खतमात्रा किलो/ आठवडा)

१ ते १६ आठवडे : युरिया ५.५, मोनो अमोनिअम फॉस्फेट ४.६५, म्युरेट ऑफ पोटॅश ३

१७ ते २८ आठवडे : युरिया १३.५, म्युरेट ऑफ पोटॅश ८.५

२९ ते ४० आठवडे : युरिया ५.५, म्युरेट ऑफ पोटॅश ७

४१ ते ४४ आठवडे : युरिया ४, म्युरेट ऑफ पोटॅश ५

-----------------------------------------------------------------------------------------------------------------

अधिक माहितीसाठी आठवडी पिक सल्ला,कृषी वार्ता साठी कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.


Post a Comment (0)
Previous Post Next Post