आंबा फळांचे आठवडी नियोजन

 आंबा

योग्य परिपक्वता ओळखण्यासाठी फळांची घनतेनुसार वर्गवारी करावी. फळे साध्या पाण्यात आणि नंतर अडीच टक्के मिठाच्या द्रावणात बुडवावीत. जी फळे पाण्यात बुडतात आणि मिठाच्या पाण्यात तरंगतात अशी फळे दीर्घकाळ टिकतात. मिठाच्या द्रावणात बुडलेली फळे आतून पिकण्यास सुरुवात झालेली असते, तर पाण्यात तरंगणारी फळे अपरिपक्व असलेली आढळतात, ज्यांना चव न येता पुढे सुरकुत्या पडतात. घनतेनुसार वर्गवारी झाल्यावर वजनानुसार प्रतवारी करावी. यात ३०० ग्रॅमहून अधिक, ३०० ते २७५ ग्रॅम, २७५ ते २५० ग्रॅम, २५० ते २२५ ग्रॅम, २२५ ते २०० ग्रॅम व २०० ग्रॅमहून कमी असे सहा वर्ग तयार होतात. काहीवेळा चार वर्गातच प्रतवारी करण्याची पद्धत आढळते.

----------------------------------------------------------------------------------------------------------------

अधिक माहितीसाठी आठवडी पिक सल्ला,कृषी वार्ता साठी कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.


Post a Comment (0)
Previous Post Next Post