गारपीटग्रस्त केळीबागेचे व्यवस्थापन

 केळी

🍌 गारपीटग्रस्त केळीबागेचे व्यवस्थापन 


 👉 पूर्णपणे उन्मळून पडलेली झाडे बागेबाहेर काढावीत. वाकलेल्या झाडांना आधार द्यावा.
👉 विक्रीयोग्य घडांची त्वरित कापणी करून विक्री करावी.
👉 घडांतील इजा झालेली केळी काढून त्यांची विल्हेवाट लावावी.
👉 नवीन बागेतील जास्त नुकसान झालेल्या झाडांची एक ते दोन नुकसानग्रस्त पाने कापून घ्यावीत.
👉 सहा महिन्यांच्या झाडांची पाने पूर्णपणे फाटली असल्यास, अशी झाडे कापून बागेबाहेर काढून टाकावीत.
👉 घड निसवण होऊन दोन महिने झालेल्या झाडांची पाने पूर्णपणे फाटली असली तरी, अशा घडांना पक्वतेसाठी फक्त पाण्याची गरज असते. म्हणून अशा झाडांचे योग्य पाणी व्यवस्थापन करावे.
👉 ज्या झाडांची निसवण झालेली नाही, मात्र त्यांची पाने पूर्ण फाटून गेली आहेत, अशा झाडांना चार किंवा त्यापेक्षा जास्त पाने फुटण्याची वाट पाहावी. त्यासाठी झाडांचे योग्य व्यवस्थापन करावे. हे करूनही पाने न फुटल्यास अशी झाडे काढून टाकावीत.
👉 संपूर्ण बागेतील झाडांची पाने फाटून गेली असल्यास, अशा झाडांचे योग्य पोषण करून नवीन जोमदार फुटवे वाढवून पहिले खोडवा पीक घेता येऊ शकते.
👉 कोवळ्या नुकसानग्रस्त घडांचा वापर पशुखाद्य म्हणून करता येईल.


👉 गारपिटीमुळे झाडांची पाने, खोड व घडांवर जखमा होऊन बुरशीजन्य किंवा जिवाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. झाडांवर कार्बेन्डाझीम (आंतरप्रवाही बुरशीनाशक) १ ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणात फवारणी करावी.
👉 रोग नियंत्रण सिगाटोका लीफ स्पॉट (फवारणी प्रति लिटर पाणी) मॅन्कोझेब २.५ ग्रॅम (स्पर्शजन्य बुरशीनाशक)
 किंवा प्रोपीकोनॅझोल १ मि.लि. (आंतरप्रवाही बुरशीनाशक)

------------------------------------------------------------------------------------------------------------------

अधिक माहितीसाठी आठवडी पिक सल्ला,कृषी वार्ता साठी कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.

Post a Comment (0)
Previous Post Next Post