आंबा पीक संरक्षण

 आंबा

🥭पीक संरक्षण


पाऊस झाल्यास आंबा फळांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. या रोगाच्या प्रादुर्भावामुळे फळांवर काळे डाग पडण्याची शक्यता असते. याकरिता प्रतिबंधात्मक उपाय म्हणून कार्बेन्डाझिम (१२%) + मॅन्कोझेब (६३% डब्ल्यूपी) (संयुक्त बुरशीनाशक) १ ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. सध्या रात्रीचे तापमान १८ ते २२ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहत आहे. हे भुरी रोगाच्या वाढीसाठी पोषक असून तिसऱ्या टप्प्यातील मोहोर आणि नुकतीच फळधारणा झालेल्या आंबा पिकावर रोगाचा प्रादुर्भाव दिसून येऊ शकतो. त्याच्या नियंत्रणासाठी, हेक्झाकोनॅझोल (५ ईसी) ०.५ मि.लि. प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. ढगाळ वातावरणामुळे आंबा फळांवर फळमाशीचा प्रादुर्भाव दिसून येण्याची शक्यता असते. त्यापासून संरक्षणासाठी रक्षक फळमाशी सापळे प्रति एकरी २ या प्रमाणात बागेमध्ये झाडांच्या उंचीप्रमाणे साधारण जमिनीपासून दोन ते तीन मीटर उंचीवर राहतील, अशाप्रकारे टांगावे. या सापळ्यात ठेवलेले रासायनिक आमिष (मिथाईल युजेनॉल) सहा ते सात आठवड्यांपर्यंत चालते. मात्र त्यानंतर परत २ ते ३ मि.लि. आमिष (मिथाईल युजेनॉल) जाळीदार डब्यात ठेवलेल्या बोळ्यात घालावे. खालील साबणाचे पाणी आवश्यकतेनुसार बदलावे.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------

अधिक माहितीसाठी आठवडी पिक सल्ला,कृषी वार्ता साठी कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.



Post a Comment (0)
Previous Post Next Post