गारपीटग्रस्त लिंबूवर्गीय फळबागेचे व्यवस्थापन

 संत्रा-मोसंबी-लिंबू

🍊गारपीटग्रस्त लिंबूवर्गीय फळबागेचे व्यवस्थापन

👉 मृग बहराची फळे गारपिटीमुळे गळालेली असल्यास, त्यांची योग्य विल्हेवाट लावावी.
👉 मृग बहराच्या फळांची गळ थांबविण्याकरिता, २,४-डी १.५ ग्रॅम अधिक कार्बेन्डाझिम १०० ग्रॅम आणि युरिया १.५ किलो प्रति १०० लिटर पाण्यात मिसळून त्वरित फवारणी करावी.
👉 मृग बहरातील फळांचा आकार वाढण्यासाठी, पोटॅशिअम नायट्रेट १.५ किलो प्रति १०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
👉 आंबिया बहराची फुले, छोटी फळे किंवा नवीन आलेली पालवी यांची गळ झाली आहे. शिल्लक राहिलेला बहर टिकविण्यासाठी जिबरेलिक अॅसिड १.५ ग्रॅम अधिक कार्बेन्डाझिम १०० ग्रॅम अधिक युरिया १ किलो प्रति १०० लिटर पाण्यात मिसळून त्वरित फवारणी करावी. पुन्हा पाऊस किंवा गारपीट झाल्यास एक ते दोन दिवसांच्या अंतराने पुन्हा वरील फवारणी करावी. त्याचप्रमाणे पाऊस-गारांचे सत्र संपल्यानंतर पुन्हा आठ ते दहा दिवसांनी वरील
फवारणी घ्यावी.
👉 गारपिटीमुळे मोडलेल्या फांद्या सिकॅटरने कापून टाकाव्यात. त्यानंतर त्वरित कार्बेन्डाझिम १०० ग्रॅम अधिक युरिया एक किलो प्रति १०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
👉 गारपिटीमुळे झाडावरील पाने गळतात, फांद्या आणि खोडांनासुद्धा जखम होते. अशा जखमांमध्ये अन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. जखम झालेल्या खोडावर बोर्डोपेस्ट लावावी.
👉 गारपिटीमुळे लिंबू झाडांवर खैऱ्या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. याकरिता रोगग्रस्त फांद्या व पाने यांची छाटणी करावी. झाडांवर व झाडांच्या आळ्यांमध्ये कॉपर ऑक्सिक्लोराईड ३ ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे गच्च फवारणी करावी.
------------------------------------------------------------------------------------------------------------------

अधिक माहितीसाठी आठवडी पिक सल्ला,कृषी वार्ता साठी कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.



Post a Comment (0)
Previous Post Next Post