केळी
काही भागात केळीची फेब्रुवारी महिन्यात लागवड केली जाते. लागवड करताना गादीवाफ्यावर वाण निवडीनुसार शिफारशीत अंतरावर करावी. लागवडीसाठी श्रीमंती, फुले प्राइड (१.५ बाय १.५ मीटर) आणि ग्रॅंड नैन (१.७५ बाय १.७५ मीटर) या वाणांची निवड करावी. उती संवर्धित रोपांची लागवड करताना एक सारख्या वाढीची, ३० ते ४५ सें.मी. उंच व किमान ५ ते ७ पाने असलेली रोपे निवडावीत. सिंचनासाठी ठिंबक सिंचन पद्धतीची सोय करावी. केळी लागवड करतेवेळी बागेभोवती शेवरीची वारारोधक कुंपण म्हणून लागवड करावी.