हळद पिक सल्ला हळकुंड वाढीचे नियोजन

 हळद

वाढीच्या दुसऱ्या अवस्थेनंतर म्हणजेच लागवडीपासून पाच ते साडे पाच महिन्यांनंतर हळदीची उंची वाढत नाही. या टप्प्यात नत्रयुक्त खतांचा वापर कमी करावा. साडेपाच फुटांपेक्षा हळदीची उंची अधिक असल्यास क्‍लोरमेक्वाट क्‍लोराईड सारख्या वाढ नियंत्रकाचा वापर तज्ञांच्या सल्ल्याने करावा. त्यामुळे हळद काडावरती जाण्याचा धोका टळतो. वाढीची तिसरी अवस्था पाच ते सात महिने या दरम्यान असते. या अवस्थेमध्ये ०-०-५० या विद्राव्य खताचा वापर करावा. ओली हळकुंडे सूर्यप्रकाशात उघडी दिसत असल्यास हळकुंडे हिरवी पडून वाढ थांबते. तसेच पूर्ण वाढ झालेल्या हळकुंडाच्या टोकाकडील भागातून पान बाहेर पडते व त्याची जाडी कमी होते, पर्यायाने उतारा कमी मिळतो. हे टाळण्यासाठी उघड्या पडलेल्या हळकुंडावर माती टाकावी.

अधिक माहितीसाठी कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.



Post a Comment (0)
Previous Post Next Post