केळी बागेची सर्वसाधारण देखभाल

 केळी

बागेची सर्वसाधारण देखभाल 

👉 बागा तणमुक्त ठेवाव्यात. 

👉 जमिनीलगतची पाने कापून त्याची बागेबाहेर नेऊन योग्य विल्हेवाट लावावी. 

👉 मुख्य खोडाशेजारी येणारी पिल्ले जमिनीलगत धारदार विळीने नियमित कापावीत. 

👉 बागेत पाणी साचलेले असेल, तर अतिरिक्त पाणी बागेबाहेर काढावे. बाग नेहमी वाफसा स्थितीत ठेवावी. शिफारस केलेल्या वेळापत्रकानुसार पाणी द्यावे. 

👉 मुख्य वाढीच्या अवस्थेतील मृगबागेस पाण्याद्वारे (फर्टिगेशन) ४.५ किलो युरिया, ६.५ किलो मोनो अमोनियम फॉस्फेट व ३ किलो म्युरेट ऑफ पोटॅश ही खते द्यावीत. 

👉 मुख्य वाढीच्या अवस्थेतील मृगबागेस जमिनीतून खते देण्यासाठी ८२ ग्रॅम युरिया बांगडी पद्धतीने किंवा झाडाच्या दोन्ही बाजूंनी कोली घेवून खत द्यावे. खत दिल्यानंतर लगेच मातीआड करावे. 

👉 नवी लागवड केलेल्या मृगबागेतील विषाणूजन्य झाडे मुळासकट उपटून नष्ट करावीत. 

👉 केळी बागेभोवती सजीव कुंपण (शेवरी) वारा प्रतिरोधक म्हणून लावावे. 

👉 केळी लागवडीनंतर दुसऱ्या व चौथ्या महिन्यात इडीटीए झिंक आणि इडीटीए फेरस यांची प्रत्येकी ०.०५ टक्के (१० लिटर पाण्यात ५ ग्रॅम) फवारणी करावी.

अधिक माहितीसाठी कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.



Post a Comment (0)
Previous Post Next Post