टोमॅटो पिकातील मर रोग व्यवस्थापन.

 टोमॅटो

मर 

जमिनीतील ‘फ्युजॅरीअम ऑक्झिस्पोरम लायकोपरसिकी’ या बुरशीच्या प्रादुर्भावामुळे पाने पिवळसर होऊन झाड मरते. या रोगामुळे नवीन झाड अचानक कोलमडलेले दिसते, परंतु जुने झाड हळूहळू मरते. रोगामुळे मुळाच्या आणि खोडाच्या आतील पेशी कुजतात, झाडांची वाढ खुंटते व झाड मरते. ढगाळ किंवा अधिक आर्द्रतापूर्ण हवामानामध्ये मर रोगग्रस्त झाडांच्या खोडावर बुरशीचा गुलाबी थर दिसतो. अशा रोगग्रस्त झाडांचे खोड चाकूने उभे कापून निरीक्षण केल्यास आतील गाभा तपकिरी रंगाचा दिसतो. 

🛡️ उपाययोजना 

👉 जमीन मध्यम प्रतीची, उत्तम निचरा होणारी असावी. 

👉 पिकाची फेरपालट करावी. 

👉 रोपवाटिकेत बियाणे पेरण्यापूर्वी बीजप्रक्रिया करावी. 

👉 लागवडीपूर्वी जमिनीत एकरी २ किलो ट्रायकोडर्मा भुकटी शेणखतात मिसळून टाकावी. 

👉 रोप लागवडीपूर्वी कार्बेन्डाझिम (५० डब्ल्यूपी) १० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळावे. या द्रावणात रोपांची मुळे बुडवून नंतरच रोपांची लागवड करावी. 

👉 शेतामधून पावसाच्या अथवा सिंचनाच्या साठलेल्या पाण्याचा चर काढून योग्य पद्धतीने निचरा करावा. 

👉 रोगाची लक्षणे दिसल्यास, जमिनीत वाफसा येताच, कॉपर ऑक्सिक्लोराईड ३ ग्रॅम किंवा कॅप्टन ३ ग्रॅम किंवा कार्बेन्डाझिम १ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून प्रति झाड ५० ते १०० मि.लि. द्रावण गोलाकार आळे करून बुंध्याशी ओतावे.

अधिक माहितीसाठी कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.


Post a Comment (0)
Previous Post Next Post