टोमॅटो
ट्रे पद्धतीने रोप निर्मिती
🍅 ट्रे पद्धतीने रोपे तयार करण्यासाठी ९८ कप्पे असलेला प्रो-ट्रे वापरावा. एक ट्रे भरण्यासाठी किमान १.२५ किलो कोकोपीट आवश्यक असते. कोकोपीटद्वारे भरलेल्या ट्रेमध्ये एका कप्प्यात एक बी याप्रमाणे बी पेरावे.
🍅या पद्धतीमध्ये बियाणे वाया जात नाही. तसेच रोपांची वाढ सशक्त होते. रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो.
🍅रोपांच्या वाहतुकीसाठी ट्रे पद्धत सोईस्कर ठरते.
🍅अन्नद्रव्यांसाठी रोपांमध्ये स्पर्धा होत नाही. त्यामुळे रोपांची एकसारखी वाढ होते.
🍅पनर्लागवडीवेळी रोपे काढताना मुळे तुटण्याचा धोका नसतो. रोपे अलगद निघतात. त्यामुळे पुनर्लागवडीतील रोपांचे होणारे नुकसान टाळले जाते.