केळी बाग खत व्यवस्थापन |सेंद्रिय खते,जैविक खते,रासायनिक खते|

 केळी

खत व्यवस्थापन 
✔️ सेंद्रिय खते
प्रति झाड १० किलो शेणखत किंवा ५ किलो गांडूळखत

✔️जैविक खते
लागवडीच्या वेळी २५ ग्रॅम ॲझोस्पिरीलम व २५ ग्रॅम पी.एस.बी. शेणखतात मिसळून द्यावे.

✔️ रासायनिक खते
 प्रति झाड २०० ग्रॅम नत्र, ६० ग्रॅम स्फुरद व २०० ग्रॅम पालाश देण्याची शिफारस आहे. रासायनिक खतांचा कार्यक्षमपणे उपयोग होण्यासाठी बांगडी पद्धतीने खोलवर खते देऊन मातीने झाकावीत. माती परीक्षण अहवालानुसार खतमात्रेत योग्य बदल करावेत.

🤲 जमिनीतून रासायनिक खत देण्याचे वेळापत्रक (ग्रॅम प्रति झाड) खतमात्रा देण्याची वेळ युरिया एस.एस.पी. एम.ओ.पी. लागवडीनंतर ३० दिवसांत ८२ ३७५ ८३
लागवडीच्या ७५ दिवसांनंतर ८२ ०० ००
लागवडीच्या १२० दिवसांनंतर ८२ ०० ००
 लागवडीच्या १६५ दिवसांनंतर ८२ ०० ८३
लागवडीच्या २१० दिवसांनंतर ३६ ०० ००
लागवडीच्या २५५ दिवसांनंतर ३६ ०० ८३
लागवडीच्या ३०० दिवसांनंतर ३६ ०० ८३
एकूण ४३६ ३७५ ३३

अधिक माहितीसाठी कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.


Post a Comment (0)
Previous Post Next Post