केळी बाग |सिगाटोका (करपा) रोगाचे एकात्मिक पद्धतीने व्यवस्थापन|

 केळी

सिगाटोका (करपा) रोगाचे एकात्मिक पद्धतीने व्यवस्थापन 

👉 रोगट पानांचा भाग किंवा पाने कापून नष्ट करावीत. 

👉 शरीमंती या करपा सहनशील वाणाची लागवड करावी. 

👉 शिफारशीत अंतरावर (१.५ मी. बाय १.५ मीटर किंवा १.८ मी. बाय १.८ मीटर) लागवड करावी. 

👉 बागेत पाणी साचून राहणार नाही आणि पाण्याचा योग्य निचरा होईल, याकडे लक्ष द्यावे. 

👉 ठिबक सिंचन पद्धतीने पाणी देताना हवामान, वाढीची अवस्था आणि जमिनीची मगदूर यानुसार पाण्याची मात्रा ठरवावी. 

👉 केळी बाग आणि बांध नेहमी तणमुक्त आणि स्वच्छ ठेवावेत. 

👉 मुख्य खोडाच्या बगलेत येणारी पिले नियमितपणे कापावीत. 

👉 शिफारस केलेल्या अन्नद्रव्यांची मात्रा (नत्र २०० ग्रॅम, स्फुरद ४० ग्रॅम, पालाश २०० ग्रॅम प्रति झाड) वेळापत्रकानुसार द्यावी. 

👉 बागेतील पिकाचे अवशेष गोळा करून नष्ट करावेत. 

👉 केळी हे एक पीक सतत न घेता पिकाची फेरपालट करावी. 

👉 रासायनिक नियंत्रण (फवारणी प्रतिलिटर पाणी) 

प्राथमिक लक्षणे दिसताच,  क्लोरोथॅलोनील २ मिलि किंवा मॅन्कोझेब किंवा कॉपर ऑक्झिक्लोराइड २.५ ग्रॅम स्टिकरसह पाण्यात मिसळून आलटूनपालटून फवारणी करावी. 

प्रादुर्भाव जास्त झाल्यास, कार्बेन्डाझिम १ ग्रॅम किंवा प्रॉपीकोनॅझोल १ मि.लि. स्टिकर मिसळून आलटून पालटून फवारणी करावी.

अधिक माहितीसाठी कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.

Post a Comment (0)
Previous Post Next Post