रांगडा कांदा रोपवाटिका व्यवस्थापन

रांगडा कांदा

🧅 रांगडा कांदा पुनर्लागवडीसाठी पूर्वमशागत व रानबांधणी शेताची नांगरणी करून व कुळवाच्या पाळ्या देऊन मोठी ढेकळे फोडून जमीन भुसभुशीत करावी. वाफे तयार करण्यापूर्वी एकरी ६ टन चांगले कुजलेले शेणखत किंवा ३ टन कोंबडी खत किंवा ३ टन गांडूळखत पसरून जमिनीत चांगले मिसळावे. १२० सें.मी. रुंद, ४० ते ६० मीटर लांब आणि १५ सें.मी. उंचीचे गादीवाफे ट्रॅक्टरला जोडता येणाऱ्या सरीयंत्राने तयार करावेत. सरीयंत्राच्या फाळाची दोन टोके १६५ सें.मी. अंतरावर कायम करून ट्रॅक्टर चालवला तर १२० सें.मी. रुंदीचा गादीवाफा तयार होतो. वाफ्याच्या दोन्ही कडेला ४५ सें.मी. रुंदीच्या दोन सऱ्या तयार होतात. या जागेचा उपयोग फवारणी करणे, गवत काढणे, पिकाचे निरीक्षण करण्यासाठी होतो. रुंद गादीवाफ्यांची पद्धत ठिबक आणि तुषार सिंचनाकरिता सोईची आहे. ठिबक सिंचनासाठी, प्रत्येक गादीवाफ्यामध्ये इनलाईन ड्रिपर असणाऱ्या १६ मि.मी. व्यासाच्या दोन लॅटरलचा वापर करावा. ताशी ४ लिटर उत्सर्जन क्षमतेच्या दोन ड्रिपरमधील अंतर ३० ते ५० सें.मी. असावे. तुषार सिंचनासाठी, २० मि.मी. व्यासाच्या लॅटरलमध्ये ताशी १३५ लिटर पाणी ६ मीटर अंतरावर फेकणारे नोझल असावे.

अधिक माहितीसाठी कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.





Post a Comment (0)
Previous Post Next Post