टोमॅटो पिकातील फळ तडकणे

टोमॅटो

🍅फळ तडकणे

ही टोमॅटो पिकामध्ये जास्त प्रमाणात आढळून येणारी विकृती आहे. फळ पक्वतेच्या अवस्थेत असताना अधिक ऊन, उच्च आर्द्रता, अचानक जास्त पाऊस किंवा जास्त पाणी देणे यांमुळे जमिनीतील ओलाव्यात मोठ्या प्रमाणात बदल झाल्यामुळे फळे तडकतात. पिकामध्ये बोरॉन या सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता, आनुवंशिक गुणधर्म इत्यादी कारणांमुळे ही समस्या दिसून येते.

🛡️ उपाययोजना
👉परतिकारक्षम जातींचा लागवडीसाठी उपयोग करावा. उदा. अर्का सौरभ, अर्का विशाल, पुसा केसरी इ.
👉लागवडीसाठी गादी वाफा, ठिबक सिंचन, आच्छादन यांचा अवलंब करावा.
👉पाणी व्यवस्थापन योग्यप्रकारे करावे. जमिनीमध्ये एकसमान ओलावा राखावा.
👉माती परीक्षण करून संतुलित प्रमाणात खते वापरावीत.
👉माती परीक्षणानुसार जमिनीतील बोरॉनचे प्रमाण ०.५ मिलिग्रॅम प्रति किलो (पीपीएम) पेक्षा कमी असल्यास कमतरता समजावी. जमिनीतून २ किलो बोरॅक्स प्रति एकर शेणखतातून द्यावे. फवारणीद्वारे ०.०५ ते ०.१ टक्के (०.५ ते १ ग्रॅम प्रति लिटर पाणी) बोरीक अॅसिडची फवारणी करावी.

अधिक माहितीसाठी कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.



Post a Comment (0)
Previous Post Next Post