केळी बाग पीक संरक्षण

 केळी
पीक संरक्षण
⭕️करपा

👉रोगग्रस्त पानाचा भाग किंवा पूर्ण पाने कापून बागेबाहेर नेऊन नष्ट करावीत.
👉नियंत्रणासाठी, मॅंकोझेब २.५ ग्रॅम किंवा कॉपर ऑक्झीक्लोराईड २.५ ग्रॅम किंवा प्रोपीकोनॅझोल १ मि.लि. अधिक स्टीकर १ मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणे आवश्यकतेनुसार बुरशीनाशकांची आलटून पालटून फवारणी करावी.

⭕️विषाणूजन्य रोग

👉बागेचे सातत्याने निरीक्षण करावे. कुकुंबर मोझॅक व पर्णगुच्छ प्रादुर्भावग्रस्त झाडे मुळांसहित उपटून दूर ठिकाणी जाळून किंवा गाडून टाकावीत.
👉बागेत काकडीवर्गीय तसेच टोमॅटो, मिरची, वांगी, मका लागवड करू नये.
👉बागेभोवतीचे रान कारली, शेंदणी, करटुले, गुळवेल यांसारख्या रानटी झाडांचे वेल नष्ट करावेत.
👉मावा नियंत्रणासाठी, डायमिथोएट (३० ईसी) २ मि.लि. किंवा थायमेथोक्झाम (२५ डब्लूजी) ०.२ ग्रॅम किंवा इमिडाक्लोप्रीड (१७.८ एसएल) ०.५ मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.
⭕️फुलकीड
👉ॲसिटामिप्रीड (२० एसपी) ०.१२५ ग्रॅम अधिक स्टीकर १ मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणे शेवटचे पान निघाल्यावर किंवा केळफुल निसवतेवेळी पहिली फवारणी करावी. संपूर्ण फण्या निसवल्यावर दुसरी फवारणी करावी.
⭕️फळमाशी
👉घडांची कापणी योग्य पक्वतेवर करावी.
👉परादुर्भावग्रस्त केळी गोळा करून नष्ट करावी.
👉बागेत दर ५० मीटर अंतरावर मिथील युजेनॉलचे सापळे ठेवावेत.

अधिक माहितीसाठी कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.



Post a Comment (0)
Previous Post Next Post