कापूस पिकातील पातेगळ व्यवस्थापन

 कापूस

जास्त पाऊस झालेल्या ठिकाणी आकस्मिक मर (पॅरा विल्ट) रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्याच्या व्यवस्थापनासाठी पिकात साचलेले पाणी चर काढून त्वरित शेताबाहेर काढून द्यावे.  प्रादुर्भावाची लक्षणे दिसलेल्या झाडांच्या मुळाशी, कॉपर ऑक्सिक्लोराईड (५० डब्लूपी) २.५ ग्रॅम किंवा कार्बेन्डाझिम (५० डब्लूपी) २ ग्रॅम अधिक युरिया १० ग्रॅम प्रति लिटर पाणी प्रमाणे आळवणी करावी. 

दमट व ढगाळ वातावरणात रसशोषक किडींचा प्रादुर्भाव वाढू शकतो. त्यांच्या व्यवस्थापनासाठी, ॲझाडीरॅक्टिन (१०,००० पीपीएम) २-३ मि.लि. प्रति लिटर पाणी किंवा व्हर्टिसिलियम लेकॅनी १ किलोग्रॅम प्रति एकर किंवा फ्लोनिकॅमिड (५० डब्ल्यूजी) ६० ग्रॅम किंवा डायनेटोफ्यूरॉन (२० एसजी) ६० ग्रॅम किंवा बुप्रोफेझीन (२५ एससी) ४०० मि.लि. किंवा ॲसेटामीप्रीड (२० एसपी) ४० ग्रॅम प्रति एकर प्रमाणे पावसाची उघडीप असताना फवारणी करावी. 

फुले व पात्या यांची गळ होऊ नये, यासाठी नॅप्थील ॲसेटिक ॲसिड (एनएए) या संजीवकाची ३ ते ४ मि.लि. प्रति १५ लिटर पाण्यातून फवारणी करावी.

अधिक माहितीसाठी कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.

Post a Comment (0)
Previous Post Next Post