संत्रा-मोसंबी-लिंबू रोग व किडी पीक संरक्षण

 संत्रा-मोसंबी-लिंबू

पीक संरक्षण 

👉 फळांवरील फायटोप्थोरा तपकिरी कूज नियंत्रणासाठी, फोसेटिल एएल २.५ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये ४० दिवसांच्या अंतराने दोनवेळा फवारणी करावी. 

👉मळकूज होत असलेल्या बगीच्यात मेफेनोक्झाम एम किंवा फोसेटिल एएल २.५ ग्रॅम प्रति लिटर पाणी या द्रावणाची झाडाच्या आकारमानानुसार प्रति झाड ५ ते १० लिटर द्रावणाची ४० दिवसांच्या अंतराने दोनवेळा आळवणी व फवारणी करावी. 

👉कॉलेटोट्रीकम आणि बोट्रीओडिप्लोडिया बुरशी प्रभावित झाडांवर कार्बेन्डाझिम किंवा थायोफनेट मिथाइल १ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात १० दिवसांच्या अंतराने दोनवेळा फवारणी करावी. 

👉फळमाशीच्या नियंत्रणासाठी एकरी ८ ते १० मिथाईल युजेनॉल कामगंध सापळे लावावेत. दर १५ ते २० दिवसांच्या अंतराने आमिष (मिथाईल युजेनॉल) बदलावे. 

👉फळांच्या परिपक्वतेच्या अवस्थेत फळांचा रंग बदलाच्या वेळी फळ रस शोषण करणाऱ्या पतंगाच्या व्यवस्थापनासाठी कडूलिंबाचे तेल १० मि.लि. किंवा पेट्रोलिअम फवारणी तेल (खनिज तेल) २० मि.लि. प्रति लिटर पाणी प्रमाणे १०-१५ दिवसांच्या अंतराने, फळांची तोडणी होईपर्यंत फवारणी करावी. बगीच्यात झाडाखाली पडलेली फळे एकत्र करून कंपोस्ट खड्ड्यात पुरून टाकावीत.

अधिक माहितीसाठी कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.


Post a Comment (0)
Previous Post Next Post