टोमॅटो वाढीच्या अवस्थेनुसार नियोजन

टोमॅटो

वाढीच्या अवस्थेनुसार नियोजन 


टोमॅटो पीकवाढीच्या अवस्थेनुसार योग्य काळजी घेणे गरजेचे असते. आंतरमशागत, पाणी आणि खत व्यवस्थापन, कीड-रोग नियंत्रण आदी बाबींचे नियोजन वाढीच्या अवस्थेनुसार करावे. 

🍅 पहिली अवस्था 

ही रोपवाटिकेतील अवस्था असून ती २५-३० दिवसांची असते. 

रोपवाटिकेत बियाणे पेरणी केल्यानंतर २५-३० दिवसांत रोपे पुनर्लागवडीसाठी तयार होतात. 

या अवस्थेमध्ये रोपे ४-५ पानांची असतात. 

🍅 दुसरी अवस्था 

ही अवस्था लागवडीपासून २० दिवसांची असून यात रोपे स्थिर होतात. 

ही साधारण १५-२० दिवसांची अवस्था असते. 

या अवस्थेत मुळे नाजूक असून जमिनीतील अन्नद्रव्ये शोषणे शक्य नसते. त्यामुळे रोपांची विशेष काळजी घेणे गरजेचे असते. 

रोपे स्थिर झाल्यानंतर शाकीय वाढ होण्यास सुरुवात होते. 

🍅 तिसरी अवस्था 

ही लागवडीपासून ३०-३५ दिवसांची अवस्था आहे. यात रोपांची शाकीय वाढ जोमाने होते. 

झाडांना गरजेप्रमाणे अन्नद्रव्यांचा पुरवठा करावा. त्यामुळे झाडे सशक्त होऊन चांगला विस्तार होतो. 

या अवस्थेमध्ये कीड-रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. त्यामुळे पिकाचे वेळोवेळी निरीक्षण करावे. 

🍅 चौथी अवस्था 

ही लागवडीपासून ३५-४५ दिवसांनी येणारी फुलकळीची अवस्था असते. 

या अवस्थेत पिकास फुले येऊन फळे तयार होण्यास सुरुवात होते. त्यामुळे या अवस्थेत अन्नद्रव्यांची गरज अधिक असते. 

अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे फुलगळ, फळगळ होण्याची शक्यता असते. त्यामुळे अन्नद्रव्यांचा संतुलित पुरवठा होणे आवश्यक असते. 

🍅 पाचवी अवस्था 

ही लागवडीपासून ५५-६० दिवसांची अवस्था असून यात फळांची वाढ होते. 

या अवस्थेत फुलांची व फळांची संख्या वाढण्यासाठी नियोजनबद्ध व्यवस्थापन करणे गरजेचे असते. 

योग्य काळजी घेतल्यास फळांचा रंग, आकार, चव आणि उत्पादनवाढीस मदत होते.

अधिक माहितीसाठी कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.


Post a Comment (0)
Previous Post Next Post