संत्रा-मोसंबी-लिंबू आठवडी सल्ला

संत्रा-मोसंबी-लिंबू

बागेमधून पावसाच्या जास्तीच्या पाण्याचा निचरा होतो आहे की नाही, याकडे लक्ष द्यावे. निचरा व्यवस्थित होत नसल्यास खोदलेल्या चराची दुरूस्ती करावी व साचलेले पाणी काढून टाकावे. 

झाडावरील पानसोट काढून टाकावे. पानसोट त्रिकोणी आकाराचे, अधिक गडद हिरवे आणि सरळ लांब वाढतात. त्यांची पानेसुद्धा मोठ्या आकाराची असतात. 

संत्रा, मोसंबी झाडास ४५० ग्रॅम युरिया किंवा १००० ग्रॅम अमोनियम सल्फेट, ६५० ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट, १०० ग्रॅम झिंक सल्फेट, १०० ग्रॅम फेरस सल्फेट आणि १०० ग्रॅम मॅंगेनिज सल्फेट द्यावे.

अधिक माहितीसाठी कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.


Post a Comment (0)
Previous Post Next Post