केळी बाग आठवडी सल्ला

 केळी

नवीन मृगबाग केळीला लागवडीनंतर ७५ दिवसांनी जमिनीतून द्यावयाची नत्राची मात्रा प्रति झाड ८२ ग्रॅम याप्रमाणे युरिया मधून द्यावी. ठिबकव्दारे लागवडीपासून १ ते १६ आठवडे द्यावयाची खताची मात्रा हजारी ४.५ किलो युरिया, ६.५ किलो मोनो अमोनियम फॉस्फेट व ३ किलो म्युरेट ऑफ पोटॅश प्रति आठवडा देण्याचा क्रम चालू ठेवावा. 

फेब्रुवारी महिन्यात लागवड केलेल्या केळी बागेला लागवडीनंतर २१० दिवसांनी जमिनीतून प्रति झाड ३६ ग्रॅम युरियाची मात्रा द्यावी. तर, ठिबकव्दारे लागवडीनंतर १७ ते २८ आठवडे द्यावयाची खताची मात्रा हजारी १३ किलो युरिया व ८.५ किलो म्युरेट ऑफ पोटॅश दर आठवड्याला देत राहावे.

अधिक माहितीसाठी कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.


Post a Comment (0)
Previous Post Next Post