वेल वर्गीय पिके सल्ला फळकूज/ फळसड

 वेल वर्गीय पिके
फळकूज/ फळसड 

हा रोग काकडी, भोपळा, कारली, घोसाळी, पडवळ आणि इतर वेलवर्गीय पिकांवर येतो. पिथिअम, फायटोप्थोरा, फ्युजॅरिअम, बोट्रायटीस, चोनेफोरा, रायझोक्टोनिया अशा विविध रोगकारक बुरशींच्या प्रादुर्भावामुळे फळसड होते. 

🛡️ व्यवस्थापन

👉 फळांचा जमिनीशी प्रत्यक्ष संपर्क येणार नाही याची दक्षता घ्यावी. 

👉 रोगाची लक्षणे दिसताच, कॉपर ऑक्झिक्लोराईड (५० डब्ल्यूपी) २.५ ग्रॅम किंवा कॅप्टन (५० डब्ल्यूपी) २.५ ग्रॅम किंवा क्लोरथॅलोनील (७५ डब्ल्यूपी) २ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. 

👉 फळावर कापसासारख्या पांढर्‍या बुरशीची वाढ असेल, तर मेटॅलॅक्झील एम + मॅन्कोझेब (संयुक्त बुरशीनाशक) २.५ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारावे.

अधिक माहितीसाठी कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.


Post a Comment (0)
Previous Post Next Post