कापूस पिकाची वाढीची अवस्था व रसशोषक कीड प्रादुर्भाव स्थितीनुसार एकात्मिक व्यवस्थापन

 कापूस

पिकाची वाढीची अवस्था व रसशोषक कीड प्रादुर्भाव स्थितीनुसार एकात्मिक व्यवस्थापन 

⭕️ पेरणीनंतर ० ते ६० दिवसांपर्यंत 


👉तडतुडे, पांढरी माशी, फुलकिडे, मावा 

✅ पीकवाढीच्या सुरवातीच्या काळात मित्रकीटकांची संख्या भरपूर प्रमाणात असते. ते किडींची संख्या नियंत्रणात ठेवतात. रासायनिक कीडनाशकांच्या अनियंत्रित फवारणीमुळे मित्रकीटकांचा नाश होतो. 

✅ कपाशीच्या बियाण्याला निओनिकोटीनाईड्स या रासायनिक गटांतील कीडनाशकांची बीजप्रक्रिया केलेली असते. 

✅ दर २५ झाडापैकी एक झाड रसशोषक किडींनी ग्रस्त आढळल्यास, निंबोळी तेल ५ मि.लि. प्रति लिटर किंवा ५ टक्के निंबोळी अर्क अधिक डिटर्जंट पावडर १ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून प्रादुर्भावग्रस्त झाडावर फवारावे. किंवा फ्लोनिकॅमिड (५० डब्लूजी) ०.३ ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. 

👉 पिठ्या ढेकूण 

✅ शेतातील व बांधावरील गाजरगवत व अन्य यजमान वनस्पतींचा नाश करावा. 

✅पीकवाढीच्या सुरवातीला काळात रासायनिक कीटकनाशकांची फवारणी टाळावी. थोडा प्रादुर्भाव असल्यास कपाशीची प्रादुर्भावग्रस्त झाडे शक्यतो हलवू नयेत. पिठ्या ढेकूणाची पिल्ले मानवी हस्तक्षेपामुळे इतरत्र पसरू शकतात. सुरवातीच्या काळातील प्रादुर्भाव नैसर्गिक मित्रकीटकांच्या मदतीने आटोक्यात येतो.

अधिक माहितीसाठी कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.



Post a Comment (0)
Previous Post Next Post